Download App

G20 शिखर परिषदेच्या संबोधनातही पंतप्रधानांनी ‘इंडिया’चा वापर टाळला; म्हणाले भारत…

  • Written By: Last Updated:

G20 Summit : G20 ची शिखर परिषद आज 9 आणि 10 सप्टेंबरला दिल्लीत पार पडत आहे. भारताला पहिल्यांदाच या परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. यासाठी जगभरातील अनेक दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी या परिषदेला संबोधिक केलं. G20 परिषदेची शिखर परिषदेला संबोधित करताना सुरूवातीलाच पंतप्रधानांनी सर्व देशांच्या प्रतिनिधींचं स्वांगत करताना म्हटलं की, ‘भारतात आपलं स्वागत आहे.’ यावेळी त्यांनी देशाच्या नावाचा इंडिया असा उल्लेख करणं टाळलं असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पंतप्रधान मोदी काय म्हणाले पाहूयात…

Akshay Kumar Birthday: मॉडेलिंगपासून केलेली करिअरची सुरुवात; असा बनला बॉलिवूडचा ‘खिलाडी’!

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

G20 ची शिखर परिषदेला संबोधित करताना सुरूवातीलाच पंतप्रधानांनी सर्व देशांच्या प्रतिनिधींचं स्वांगत करताना म्हटलं की, भारतात आपलं स्वागत आहे. यावेळी त्यांनी देशाच्या नावाचा इंडिया असा उल्लेख करणं टाळलं असल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर ज्याप्रमाणे G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकांवर देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत होतं. त्याच प्रमाणे परिषदेमध्ये देखील सर्व देशाचं नाव भारतच होतं. मोदी ज्या पोडियमवरून संबोधित करत होते तेथेही भारत असाच उल्लेख करण्यात आला होता.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देशाच्या नावावरून वाद सुरू आहे. विरोधकांनी त्यांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवले आणि त्यानंतर हा वाद पेटला. त्यानंतर G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकांवर देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत होतं. भाजपच्या अनेक नेत्यांनी देशाचं नाव भारतच असल्याचा आग्रह देखील धरला. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका टिपण्णी देखील झाली. त्यामुळे आता देशाचं नाव बदलण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.

G20 Summit या परिषदेचा इतिहास आणि उद्देश काय? जाणून घ्या सविस्तर…

देशाचं नाव बदलणार?

तसेच लवकरच सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे त्यामध्ये देशाच्या नावातील बदलाविषयीचं विधेयक मांडण्यात येणार आहे. असं विरोधकांकडून बोललं जात आहे. तर त्याचबरोबर ज्याप्रमाणे G20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकांवर देशाचं नाव इंडिया ऐवजी भारत होतं. त्याच प्रमाणे परिषदेमध्ये देखील सर्व देशाचं नाव भारतच होतं. त्यावरून विरोधकांच्या या आरोपाला दुजोरा मिळत आहे. त्यामुळे लवकरच घटनादुरूस्ती करून देशाचं नाव बदलणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

तर संबोधनाच्या सुरूवातीला त्यांनी मोरक्को या देशात झालेल्या भूकंपावर आपल्या संवेदना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी सांगितले की, सर्व देश या कठीण परिस्थितीत मोरक्कोच्या सोबत आहेत. असा अश्वासन त्यांनी यावेळी मोरक्कोला दिलं. तर पुढे मोदी म्हणाले की, ज्या भारत मंडपममध्ये G20 ची शिखर परिषद सुरू आहे. त्याची खासियत यावेळी मोदींनी सांगितली. तसेच ते म्हणाले आपण सर्वांनी मिळून कोरोनाला हरवलं. त्यामुळे आपण एकत्र येत सर्वांनी विश्वासाने जगामध्ये सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास हा मंत्र आपल्याला मार्गदर्शन करणारा ठरेल. असा मानवतेचा संदेश त्यांनी भारताकडून जगाला यावेळी दिला.

Tags

follow us