Akshay Kumar Birthday: मॉडेलिंगपासून केलेली करिअरची सुरुवात; असा बनला बॉलिवूडचा ‘खिलाडी’!

Akshay Kumar Birthday: मॉडेलिंगपासून केलेली करिअरची सुरुवात; असा बनला बॉलिवूडचा ‘खिलाडी’!

Happy Birthday Akshay Kumar: मनोरंजन क्षेत्रातील (Entertainment) ‘खिलाडी’ (khiladi ) अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये अग्रक्रमी आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्याने मनोरंजन क्षेत्रात एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Social media) आज म्हणजेच ९ सप्टेंबर दिवशी खिलाडी त्याचा ५६वा वाढदिवस साजरा करत आहे. आजघडीला खिलाडी जरी बॉलिवूडचा सुपरस्टार असला तरी, त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)


९ सप्टेंबर १९६७ रोजी जन्मलेल्या खिलाडीने आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सिनेमामध्ये काम केले आहे. अ‍ॅक्शनपट असो, कॉमेडी किंवा फॅमिली ड्रामा, खिलाडी याने प्रत्येक व्यक्तिरेखा चांगल्या रित्या साकारली आहे. खिलाडीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. मॉडेलिंगचे फोटो बघितल्यावर खिलाडीला पहिल्यांदा ‘दीदार’ सिनेमासाठी साईन करण्यात आले होते. परंतु त्याचा ‘सौगंध’ हा सिनेमा अगोदरच प्रदर्शित झाला. १९९४मध्ये एका वर्षात त्याचे तब्बल ११ सिनेमे एकापाठोपाठ एक प्रदर्शित झाले होते.

मनोरंजन क्षेत्रातील ‘खिलाडी कुमार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षयने त्याच्या करिअरमध्ये असे ८ हटके सिनेमा केले आहेत की, ज्यांच्या नावामध्येच ‘खिलाडी’ आहे. यामुळे तो संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात ‘खिलाडी कुमार’ या नावाने ओळखला जातो. अक्षय कुमार ते ‘खिलाडी’ कुमार बनण्यापर्यंतच्या या रंजक अशा प्रवासात त्याने ‘खिलाडी’, ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘खिलाडी ४२०’, ‘खिलाडीयों का खिलाडी’, ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’, ‘इंटरनॅशनल’ खिलाडी’ आणि ‘खिलाडी ७८६’सारख्या हटक्या सिनेमाचा समावेश आहे.

Jawan Box Office Collection: किंग खानच्या ‘जवान’ने विक्रम रचला! अवघ्या दोन दिवसांत केली ‘इतकी’ कमाई

परंतु या प्रवासामध्ये खिलाडीला अनेकवेळा अपयशाचा देखील सामना करावा लागला होता. ‘फिर हेरा फेरी’ या त्याच्या ब्लॉकबस्टर असिनेमा अगोदर खिलाडीचे सलग १६ सिनेमा फ्लॉप ठरले होते. परंतु असे असून देखील त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये कोणतीही घट झाली नाही. यंदाचे वर्ष देखील खिलाडीसाठी काही खास ठरले नाही. आतापर्यंत प्रदर्शित झालेले सर्व सिनेमा फ्लॉप ठरले आहेत. मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘ओएमजी २’ या सिनेमाला दमदार यश मिळाले आहे. परंतु आज देखील खिलाडी इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता ठरला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube