Galgotias University : एआय समिट, गॅलगोटियास विद्यापीठ अन् रोबोटिक डॉग; नेमका वाद काय?

Galgotias University : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या एआय समिट एक्स्पो 2026 मध्ये बुधवारी ग्रेटर नोएडा येथील गलगोटियास विद्यापीठाला

Galgotias University

Galgotias University

Galgotias University : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या एआय समिट एक्स्पो 2026 मध्ये बुधवारी ग्रेटर नोएडा येथील गलगोटियास विद्यापीठाला बाहेरचा रास्ता दाखवण्यात आले. गलगोटियास विद्यापीठाने खोटा दावा केल्याने त्यांना एआय समिट एक्स्पो 2026 मधून बाहेर काढण्यात आले आहे. भारताने एआय समिटसाठी खूप मेहनत घेतली होती, मोठ्या संख्येने तरुणांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी बोलवण्यात आले होते मात्र गलगोटियास विद्यापीठाच्या एका खोट्या दाव्यामुळे एआय समिट एक्स्पो 2026 चे लक्ष वेगळ्या दिशेने वळवले आहे.

एका चिनी रोबोटिक डॉगला गलगोटियास विद्यापीठाने तयार केला असल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात आल्यानंतर हा वाद पेटला. गलगोटियास विद्यापीठाने रोबोटिक डॉग तयार केला नव्हता तर तो चीनी रोबोटिक्स कंपनी युनिट्री रोबोटिक्सकडून खरेदी केला होता. यानंतर याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एआय समिट एक्स्पो 2026 मधून गलगोटियास विद्यापीठाला बाहेर काढण्यात आलेय.

वाद कसा निर्माण झाला?

विद्यापीठाच्या स्टॉलवर प्रदर्शित केलेल्या रोबोटिक डॉगची ओळख युनिटी गो2 म्हणून करण्यात आली. या रोबोटिक डॉगची भारतात किंमत अंदाजे 2-3 लाख आहे. मात्र गॅलगोटियास विद्यापीठाने एआय एक्स्पो रोबोटिक डॉगला विद्यापीठाने विकसित केलेले उत्पादन म्हणून सादर केले. यामुळे देशांतर्गत नवोपक्रमांना उजाळा देण्यासाठी डिझाइन केलेल्या एआय कार्यक्रमात परदेशी तंत्रज्ञानाच्या खोट्या प्रदर्शनाबद्दल प्रश्न उपस्थित झाले.

रोबोटिक डॉगनंतर थर्मोकोल ड्रोनवर वाद

एआय इम्पॅक्ट समिटमध्ये रोबोटिक डॉग भोवती झालेल्या वादानंतर, गॅलगोटियास विद्यापीठाच्या थर्मोकोल ड्रोनवरही वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओमध्ये विद्यापीठाच्या स्टॉलवर प्रदर्शित केलेला थर्मोकोल ड्रोन स्पष्टपणे दिसतो. लोक प्रश्न विचारत आहेत की, हा खरा नवोपक्रम आहे की फक्त प्रदर्शनासाठी एक मॉडेल आहे.  गॅलगोटियास विद्यापीठाने अद्याप थरोकोल ड्रोनवर अधिकृत माहिती शेअर केली नाही. तर दुसरीकडे विद्यापीठाने यापूर्वी रोबोटिक डॉगच्या वादावर स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी सांगितले की, हे मशीन विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचे साधन म्हणून बनवले गेले होते, परंतु ते स्वतः बनवले असल्याचा कोणताही दावा करण्यात आला नव्हता. बुधवारी संध्याकाळी उशिरा, विद्यापीठाने संपूर्ण वादाबद्दल माफी मागितली.

गलगोटियास फुटबॉल ड्रोनवरूनही वादात सापडले. गलगोटियास विद्यापीठही त्यांच्या फुटबॉल ड्रोनवरून वादात सापडले आहे. अहवालानुसार ते दक्षिण कोरियामध्ये बनवले गेले आहे, परंतु विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाचा दावा आहे की, ते पूर्णपणे विद्यापीठाने विकसित केले आहे. विद्यापीठाच्या कम्युनिकेशन्स विभागातील प्राध्यापक नेहा सिंग यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी इन-हाऊस फुटबॉल ड्रोन मीडियाला समजावून सांगितले आहे. त्या दावा करतात की ड्रोनचे एंड-टू-एंड इंजिनिअरिंग विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये केले गेले होते.

अजितदादांच्या इच्छेनुसार पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त; CM फडणवीसांची मोठी घोषणा

गलगोटियास विद्यापीठ हे भारतातील शीर्ष खाजगी विद्यापीठांपैकी एक आहे, जे कृत्रिम बुद्धिमत्तेचे अभ्यासक्रम देते. जर एखाद्याला येथे चार वर्षांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगमध्ये बी.टेकचा अभ्यास करायचा असेल, तर प्रत्येक वर्षाच्या अभ्यासाचा खर्च सुमारे 200,000 रुपये असेल आणि चार वर्षांच्या अभ्यासाचा खर्च अंदाजे 800,000 रुपये असेल. इतके मोठे शुल्क आकारूनही, गलगोटियास विद्यापीठ इन-हाऊस एकही रोबोट विकसित करण्यात अयशस्वी ठरले आहे.

Exit mobile version