Gautam Adani News : उद्योगपती गौतम अदानी यांचा (Gautam Adani) मुलगा जीत अदानी आणि दिवा शाह यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या शुभप्रसंगी अब्जाधीश गौतम अदानी यांनी थोडेथोडके नाही तर तब्बल 10 हजार कोटी रुपये दान केले आहेत. आता हा पैसा हेल्थकेयर, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या विविध योजनांवर खर्च करण्यात येणार आहे. अदानी समुहाकडून दान करण्यात आलेले पैसे समाजाच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येणार आहेत. समाजातील सर्व घटकांना चांगल्या दर्जाच्या रुग्णालयांत उपचार मिळावेत यासाठी खर्च केले जाणार आहेत.
अदानींच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात गर्भ श्रीमंतांच्या परंपरेला फाटा; 10 हजार कोटी केले दान
आघाडीच्या K-12 विद्यालये आणि रोजगारासह प्रगत जागतिक कौशल्य अॅकेडमीत भारतीयांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गुजरातमधील अहमदाबाद शहरात पारंपारिक रिती रिवाजांत हा विवाह सोहळा पार पडला. हा अगदी लहान आणि खासगी समारंभ होता. त्यामुळे सर्वांनाच आमंत्रित करता आलं नाही.