Download App

भारतीय सर्कसचे जनक जेमिनी शंकरन यांचं निधन

Gemini Shankaran Passed away : भारतीय सर्कसचे जनक म्हणून ओळखले जाणारे जेमिनी शंकरन (Gemini Shankaran)यांचं निधन झालं आहे. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून कन्नूर येथील खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या शंकरन यांचे रविवारी रात्री निधन झाले. केरळचे (Kerala)मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan)यांनी भारतीय सर्कस जगभरात लोकप्रिय करण्यात प्रमुख भूमिका बजावल्याबद्दल शंकरन यांचे कौतुक केले. विजयन म्हणाले, भारतीय सर्कसच्या आधुनिकीकरणात त्यांची मोठी भूमिका होती. भारत सरकारने जेमिनी शंकरन यांना जीवनगौरव पुरस्काराने (Lifetime Achievement Award)सन्मानित केले आहे.

Amol Kolhe भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीपासून दूर गेल्याची ही ४ उदाहरणे

जेमिनी शंकरन हे उत्तम कलाकार असण्यासोबतच जेमिनी (Gemini Circus)आणि जंबो सर्कस (Jumbo Circus)कंपन्यांचे ते संस्थापकही होते. ते भारतातील सर्वात जुने सर्कस कलाकार मानले जातात. सर्कस कलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि देश-विदेशात विविध ठिकाणी आपले स्टंटही सादर केले.

त्यांना एमव्ही शंकरन या नावानेही ओळखले जात होते. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, राजीव गांधी, मार्टिन ल्यूथर किंग, माउंटबॅटन आणि अंतराळवीर व्हॅलेंटिना तेरेश्कोवा यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी इंडियन सर्कस फेडरेशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.

शंकरन यांचा जन्म 1924 मध्ये झाला होता. त्यांनी प्रसिद्ध सर्कस कलाकार केलेरी कुन्हीकन्नन यांच्याकडे तीन वर्षे प्रशिक्षण घेतले आणि नंतर सैन्यात भरती झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर ते निवृत्त झाले. देशभरातील विविध सर्कस गटांसोबत काम केल्यानंतर त्यांनी 1951 मध्ये विजया सर्कस कंपनी विकत घेतली आणि त्याचे नाव बदलून जेमिनी सर्कस ठेवले. पुढे त्यांनी त्यांची दुसरी कंपनी जंबो सर्कस सुरू केली.

Tags

follow us