Download App

‘गो फर्स्ट’ दिवाळखोर घोषित, प्रवाशांचे 900 कोटी अडकले

Go First Airline Bankrupt : आर्थिक संकटाने घेरलेल्या गो फर्स्ट या विमान कंपनीच्या दिवाळखोरी प्रक्रियेसाठीचा अर्ज एनसीएलटीने मंजूर केला आहे. या निर्णयानंतर कंपनीचे व्यवस्थापन आणि संचालक मंडळाला निलंबित करण्यात आले आहे. त्याच वेळी, एअरलाइन्सची सर्व उड्डाणे 19 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. NCLT ने GoFirst च्या 7000 कर्मचार्‍यांना काढून टाकण्यास बंदी घातली आहे. व्यवस्थापनाला अंतरिम कामासाठी 5 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र, यादरम्यान गोफर्स्ट एअरलाइनमध्ये आगाऊ तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना सर्वाधिक त्रास होत आहे. डीजीसीएने प्रवाशांचे पैसे लवकरात लवकर परत करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु गोफर्स्टने यावर कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. बहुतांश प्रवासी अजूनही रिफंडच्या प्रतीक्षेत आहेत.

मोदी अमेरिका दौऱ्यावर, पंतप्रधानांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये डिनर

GoFirst दिवाळखोरीच्या प्रक्रियेत गेल्याने ट्रॅव्हल एजंटही अडचणीत आले आहेत. ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच TAAI नुसार, त्यांच्या सदस्यांचे सुमारे 900 कोटी रुपये आगाऊ आणि परताव्याच्या रूपात GoFirst मध्ये अडकले आहेत. अशा परिस्थितीत या संकटावर मात करण्यासाठी ट्रॅव्हल एजंट्सनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन अडकलेल्या रकमेची माहिती देणारे निवेदन सादर करून पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

इम्रान खानवर कोठडीत अत्याचार, ‘शौचालयही वापरु दिले नाही’

TAAI ने परताव्यासाठी केलेल्या कायद्यांचा पुनर्विचार करण्याची विनंतीही केली आहे. गोफर्स्टला संपूर्ण थकबाकी त्वरित परत करण्याचे निर्देश देण्याची मागणी एजंटांनी सरकारकडे केली आहे. परतावा न मिळाल्यास उद्योग आणि ग्राहकांची रक्कम बुडण्याची भीती TAAI ला आहे.

Tags

follow us