सप्टेंबरपर्यंत कुठे दुष्काळ तर कुठे येणार पूर; जाणून घ्या ‘गॉडझिला एल निनो’ चा इशारा

El Nino : संपूर्ण देशाचे आज मान्सूनकडे लक्ष लागून आहे. दिवसांदिवस बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे 2026 मध्ये

El Nino

El Nino

El Nino : संपूर्ण देशाचे आज मान्सूनकडे लक्ष लागून आहे. दिवसांदिवस बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. तर दुसरीकडे 2026 मध्ये एल निनो मुळे देशामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. तर आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी एल निनोला यावर्षी जपानी चित्रपटसृष्टीला काल्पनिक राक्षसाचं नावंं दिलं आहे. . ‘गॉडझिला’ असं एल निनोला नाव देण्यात आले आहे. डब्लूएमओ या जागतिक हवामान संघटनेने सप्टेंबरपर्यंत एल निनो शिगेला पोहोचेल असा अंदाज वर्तवला आहे.

भयंकर दुष्काळ, जंगलं पेटणार, पूरस्थिती निर्माण होणार असा यंदाचा एल निनो बाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, सध्या प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला असून यामुळे जगभरातील तापमानावर परिणाम होणार आहे.

एल निनोमुळे पावसाचा पॅटर्न बदलणार

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात एल निनोमुळे पावसाचा पॅटर्न बदलणार आहे. जेव्हा जेव्हा एल निनोची देशात परिस्थिती आली आहे तेव्हा तेव्हा देशात मान्सूनवर परिणाम झाला असल्याची देखील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यावेळी देखील आंतरराष्ट्रीय हवामान संघटनांनी यंदा पुन्हा एल निनो निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

‘गॉडझिला’ का म्हणलं गेलं आहे?

यंदा एल निनो इतका भीषण असेल त्याला जपानी चित्रपटांमधील काल्पनिक राक्षसाचं नाव देण्यात आले आहे. चित्रपटात गॉडझिला आपल्या विशाल स्वरुपामुळे जिथेही जातो तेथील शहरं उद्धवस्त करतो. असाच काही प्रकार यंदाच्या एल निनोमुळे दिसून येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एल निनो कधी निर्माण होणार याबाबत कोणतीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही मात्र अनेक हवामान संस्थांनी एल निनोसारखी परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली असल्याची शक्यात वर्तवली आहे.

माहितीनुसार, प्रशांत महासागरात एल निनो साउथर्न ऑस्किलेशनमुळे आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडातील हवामानावर परिणाम होते. प्रशांत महासागरातील गरम हवेच्या भागाला एल निनो आणि थंड हवा असलेल्या भागाला ला निला असं म्हणतात. अमेरिकेकडून येणारे ट्रेड वारे उष्ण वाऱ्यांना आशिया आणि हिंद महासागराच्या दिशेने ढकलतात. तर उष्ण वारे हलके असल्यामुळे वर जाऊन महासागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो. मान्सूनचे थंड वारे याच पट्टयात येऊन हळूहळू भारताच्या दिशेने सरकतात.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात सरासरी 90 टक्के पाऊस होणार आहे. एल निनोमुळे मोसमी वारे उलट्या दिशेने वाहतात आणि तापमान वाढू लागतं. एल निनो निर्माण झाला की ट्रेड वारे कमकुवत होतात.

‘स्वप्न प्रशासनाची अन् ध्यास निसर्ग रक्षणाचा; ‘आउट ऑफ सिलॅबस’ च्या टीझरने वाढवली उत्सुकता

प्रशांत महासागरातील उष्ण वारे आशियाऐवजी अमेरिकेच्या दिशेने वाहू लागतात. आशिया खंडाजवळ उष्ण वाऱ्यांची तीव्रता कमी होते आणि मोसमी वारे कमकुवत होतात आणि हे वारे प्रशांत महासागराच्या मध्य भागात पोहोचतात. त्यामुळे भारतासारख्या मान्सून कमकुवत होतो.

Exit mobile version