भारत किती टन सोने आयात करतो, किती पैसे मोजतो ? आकडा धक्कादायक !

2025-26 या आर्थिक वर्षात भारताने 71.98 अब्ज डॉलर्स म्हणजे 6 लाख कोटींचे सोने आयात केलंय. ही आतापर्यंतची ऐतिहासिक उच्चांकी वाढ आहे.

Gold Import

Gold Import

Gold Import report : भारतातील सोन्याच्या आयातीबाबतची आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या 2025-26 (
Ministry of Commerce 2025-26) या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार भारताने या वर्षात सर्वाधिक सोन्याची (Gold Import) आयात केलीय. त्यामुळे प्रचंड विदेशी चलन द्यावे लागले आहे. त्यामुळे देशसमोर आर्थिक संकट उभे राहत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक वर्ष सोने खरेदी करू नये, असे आवाहन देशातील नागरिकांना केले आहे.

एका वर्षात सोने आयात 24 टक्के वाढ
2025-26 या आर्थिक वर्षात भारताने 71.98 अब्ज डॉलर्स म्हणजे 6 लाख कोटींचे सोने आयात केलंय. ही आतापर्यंतची ऐतिहासिक उच्चांकी वाढ आहे. 2024-25 या वर्षात 58 अब्ज डॉलर्सचे सोने आयात केलंय. म्हणजेच एका वर्षात 24 टक्के वाढ झालीय.


वर्षात किती टन सोने आयात ?

सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे सोने कमी आयात झालाय. त्यामुळे सोने आयात वजनात थोडी घट झालीय. 2025-26 मध्ये 721 टन आयात, तर 2024-25 मध्ये 757 टन सोने आयात. आयातीमध्ये 4.76 टक्के घट, पण किमत वाढल्याने जास्त पैसे मोजावे लागले.

भारत कोणत्या देशातून सर्वाधिक सोने आयात करतो ?

स्वित्झर्लंडमधून सुमारे 40 टक्के सोने आयात करतो. त्यामुळे हा देश सर्वात मोठा पुरवठादार. संयुक्त अरब अमिराती (UAE)चा 16 टक्के वाटा
दक्षिण आफ्रिकेचा 10 टक्के वाटा.


अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम

सोने आयातीमुळे भारताची व्यापारी तूट (Trade Deficit) 333.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचलीय. हे सोने खरेदी करण्यासाठी डॉलर्समध्ये पेमेंट करावे लागते. ज्यामुळे आपल्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. याच कारणामुळे सरकारने नागरिकांना सोन्याची खरेदी काही काळ टाळण्याचे किंवा कमी करण्याचे आवाहन केलयं. त्यामुळे देशाचे परकीय चलन वाचवता येईल.

Exit mobile version