Goldy Brar : पंजाबी गायक सिद्धू मोसेवाला याची हत्या करणारा गँगस्टर गोल्डी ब्रार (Goldy Brar ) उर्फ सतविंदर सिंग याला केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी घोषित केलं आहे. गोल्डी ब्रार आणि लखबीर सिंह लंडा हे सध्या कॅनडामध्ये लपलेले आहेत. लंडाला या अगोदरच केंद्र सरकारने दहशतवादी घोषित केलेलं आहे. यांच्याकडून खंडणी वसूल करणे, पंजाबमध्ये सिमेपलीकडून हत्यारं आणि अमली पदार्थांची तस्करी करणे अशा प्रकारचे गुन्हे करण्यात आलेले आहेत.
Ministry of Home Affairs has declared gangster Satwinder Singh alias Satinderjit Singh alias Goldy Brar as a terrorist under the Unlawful Activities (Prevention) Act, 1967. pic.twitter.com/9Ea9R6VlQ5
— ANI (@ANI) January 1, 2024
गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई या गॅंगचा गँगस्टर आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, हत्यारांची तस्करी यासारखे 13 गुन्हे दाखल आहेत. इंटरपोलने त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केलेली आहे. तरगायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डीने सोशल मीडियावर या हत्येची जबाबदारी घेतली होती. तर सप्टेंबर महिन्यामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांनी ब्रारशी संबंधित असलेल्या लोकांच्या लोकांवर छापेमारी देखील केली होती.
Randeep Hooda: लग्न तर खूप संस्कारांनी केलं अन् आता.. हनिमूनच्या फोटोंमुळे अभिनेता ट्रोल
कोण आहे गोल्डी ब्रार?
गोल्डी ब्रार हा पंजाब मधील एक गँगस्टर आहे. तो सध्या कॅनडामध्ये राहत असून शिक्षण अर्धवट सोडूनच त्याने गुन्हेगारी विश्वात काम करायला सुरुवात केली. 2019 मध्ये स्टुडंन्ट व्हिजावर तो कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेला होता. मात्र त्या ठिकाणी देखील त्याने भारतीय नेत्यांना धमकीचे कॉल करणे, खंडणी मागणे, सोशल मीडियावर हत्याच्या पोस्ट करणे असे गुन्हे केले.
पंतप्रधान राजीव गांधी अन् काँग्रेस कार्यकर्ता; रामजन्मभूमीचे कुलूप वीस मिनिटात कसे उघडले ?
तसेच गोल्डीचा चुलत भाऊ गुरलाल याची 2021 मध्ये चंदिगड एमआयडीसीमध्ये एका डिस्को बाहेर हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हप्तेचा बदला घेण्यासाठी त्याने काँग्रेस नेते गुरलाल पहिलवान यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. गोल्डचे वडील पोलीस कर्मचारी होते. तर वयाच्या 18 व्या वर्षीच त्याच्यावरती 336 नुसार गुन्हा दाखल झाला होता. मात्र या प्रकरणात त्याला जामीन मिळाला होता.