RSS : केंद्र सरकारने 58 वर्षांपूर्वीचे निर्बंध हटवले आहेत. आता सरकारी कर्मचाऱ्यांना RSS च्या कार्यक्रमांना सहभागी होऊ शकणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयावरुन विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याची परिस्थिती आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, फेब्रुवारी 1948 साली महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर सरदार पटेल यांनी आरएसएसवर निर्बंध लावले होते. त्यानंतर चांगल्या वर्तवणुकीच्या अटीवर हे निर्बंध हटवले गेले तरीही आरएसएसने नागपूरमधील कार्यालयात कधीही तिरंगा झेंडा फडकवला नाही. त्यामुळे 1966 साली आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यावर निर्बंध घालण्यात आले हा निर्णय योग्यच असल्याचं रमेश यांनी स्पष्ट केलंय.
सुप्रीम कोर्टात आज ‘NEET’ प्रकरणी सुनावणी; चाळीसपेक्षा जास्त याचिकांवर अंतिम निर्णयाची शक्यता
सरकारकडून 1966 साली जारी करण्यात आलेला आदेश हा अधिकृत असून 4 जून 2024 नंतर स्वयंभू नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान आणि RSS मधील संबंध ताणले गेले आहेत. 9 जुलै 2024 ला घातलेले निर्बंध हटवण्यात आले असून अटलबिहारी वाजपेयींच्या पंतप्रधान कार्यकाळात लागू होते, असंही जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं आहे.
भारताचं पहिलं बजेट कुणी मांडलं? कुणाच्या नावावर बजेटचं रेकॉर्ड.. वाचा खास माहिती सविस्तर
दरम्यान, 58 वर्षांपूर्वी घालण्यात केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर निर्बंध लावले होते, मात्र मोदी सरकारने आदेश रद्द केल्याचं सांगत काँग्रेसचे नेते पवन खोडा यांनी केंद्रावर सडकून टीका केलीयं. विरोधकांच्या टीकेवरुन भाजपकडूननही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं असून ५८ वर्षांपूर्वी १९६६ मध्ये जारी केलेला घटनाबाह्य आदेश मोदी सरकारकडून रद्द केला आहे. या आदेशात सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर निर्बंध लावण्यात आले होते असं भाजपा नेते अमित मालवीय यांनी म्हटलं आहे.