Air India Plane Crash Ahmedabad : अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात २६५ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर केंद्र सरकार अलर्ट झालं असून पुन्हा अशा स्वरुपाच्या घटना घडू नये, यासाठी आता पावलं उचललं जात आहे. (Crash) या पार्श्वभूमीवरच आता डीजीसीएने महत्वाचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. डीजीसीएच्या आदेशानुसार आता बोईंग ७८७ ड्रीमलायनर या विमानांची उड्डाणापूर्वी संपूर्ण सुरक्षा तपासणी अनिवार्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या या आदेशानंतर बोईंग ७८७ विमानांच्या अनिवार्य सुरक्षा तपासणी सुरु करण्यात आल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे. त्यामुळे एअर इंडियाने विमानांच्या विलंबाचा इशारा देखील दिला आहे. डीजीसीएने निर्देशित केलेल्या सुरक्षा तपासणी पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत एअरलाईन्स असून पुढील ऑपरेशन्ससाठी परवानगी देण्यापूर्वी बोईंग ७८७ विमानांची ही तपासणी केली जात असल्याचं एअर इंडियाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार! अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स लागला हाती
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने जेनएक्स इंजिनने चालणाऱ्या सर्व ड्रीमलाइनर्सची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये विमानांच्या उड्डाणापूर्वी संपूर्ण सुरक्षा तपासणी, इंधन पॅरामीटर देखरेख आणि संबंधित सिस्टमची तपासणी, केबिन एअर कॉम्प्रेसर आणि संबंधित सिस्टमची तपासणी, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण प्रणाली चाचणी, हायड्रॉलिक सिस्टमची तपासणी, टेक-ऑफ पॅरामीटर्सची तपासणी करण्याचे निर्देश डीजीसीए दिले आहेत.