West Bengal Cabinet Dissolved: विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार दिला होता. ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही दिला नव्हता. शेवटी राज्यपाल आर. एन. रवी (RN Ravi ) यांनी आपला अधिकाराचा वापर करत पश्चिम बंगाल सरकार बरखास्त केले आहे. आता भाजपला सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुमत मिळविलेले भाजप येत्या दोन दिवसांत सरकार स्थापन करणार आहे.
Governor R N Ravi dissolves West Bengal legislative assembly with effect from May 7 after completion of term: Notification. pic.twitter.com/Wu2su6MKbs
— Press Trust of India (@PTI_News) May 7, 2026
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. तब्बल पंधरा वर्षांची सत्ता गेली. तर भाजपला सर्वाधिक 204 जागा मिळाल्याने बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. परंतु मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पत्रकार परिषद घेत भाजप, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. आमचे सरकार गेलेले नाही. आम्ही पराभूत झालेलो नाही. त्यामुळे मी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली होती. मी का पायउतार होऊ? आम्ही हरलेलो नाही. जनादेश लुटला गेला आहे. राजीनाम्याचा प्रश्नच कुठे येतो? असे म्हणत त्यांनी पद सोडण्यास नकार दिला होता.
त्यामुळे बहुमत मिळूनही सरकार स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे राज्यपाल आर. एन. रवी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत पश्चिम बंगाल विधानसभा बरखास्त केली आहे. राज्यपालांनी अधिकृत आदेश जारी केला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १७४ च्या खंड (२) च्या उपखंड (ब) चा वापर करून राज्यपालांनी विधानसभा विसर्जित केली आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विधानसभेचे विसर्जन करण्यात आले आहे. या निवडणुकीत भाजपने 206 जागा जिंकून बहुमत मिळविले आहे. तर तृणमूल काँग्रेसला 80 जागांवर बहुमत मिळाले आहे.
