Download App

मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला, अनेकांना गोळ्या घातल्या; दोघे गंभीर

  • Written By: Last Updated:

Terrorist Attack On Tourists In Pahalgam : जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला (Terrorist Attack) केल्याचे वृत्त समोर आले आहे. पहलगाममधील बैसरन खोऱ्याच्या वरच्या भागात हा हल्ला झाल्याचे सांगितले जात असून, यात काही पर्यटक जखमी झाले आहेत. सध्या या ठिकाणी सुरक्षा दलाकडून दहशवाद्यांचा शोध घेतला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला आहे.

हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील एका पर्यटन स्पॉटवर मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. यात किमान ४ पर्यटक जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

Amit Shah : POK भारताचा, तिथले लोकही आपलेच; अमित शाहांनी पाकिस्तानला ठणकावलं

हे पर्यटक राजस्थानहून आल्याचे समोर आले आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यातील वरच्या भागात हा गोळीबार झाला असून, या घटनेनंतर सुरक्षा दलांकडून परिसरात दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. गेल्या काही वर्षांत पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना आहे. दहशतवादी हल्ल्यात नेमके किती पर्यटक जखमी झाले किंवा किती लोकांना गोळ्या लागल्या याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Turkey Attack: मोठी बातमी! तुर्कीच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी TUSAS वर दहशतवादी हल्ला

अलिकडेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी हिंदूंविरुद्ध एक भडकाऊ विधान केले होते. यानंतर लगेचच दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले आहे. त्यात अवघ्या काही दिवसात अमरनाथ यात्रादेखील सुरू होणार असून, पहलगाम हे पर्यटन क्षेत्र असल्याने आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. मात्र, आजच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, या हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे.

follow us