Download App

2 हजारहून अधिकच्या युपीआय व्यवहारांवर जीएसटी? असा कोणताही प्रस्ताव… सरकारने फेटाळले वृत्त

GST दोन हजारहून अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर जीएसटी लावण्यात येणार आहे मात्र हे सर्व दावे अर्थ मंत्रालयाकडून फेटाळण्यात लावण्यात आले आहे.

GST on UPI transactions above Rs 2,000 Government rejects reports : गेले काही दिवसांपासून सोशल मीडियावर तसेच माध्यमांमध्ये देखील एक बातमी येत होती की दोन हजार रुपयांहून अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर सरकारकडून जीएसटी लावण्यात येणार आहे मात्र हे सर्व दावे अर्थ मंत्रालयाकडून फेटाळण्यात लावण्यात आले आहे.

अर्थ मंत्रालयाने काय म्हटले?

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं गेलं आहे की, 2000 हून अधिकच्या यूपीआय व्यवहारांवर जीएसटी लावणार येणार असल्याच्या बातम्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत. तसेच सरकारकडून अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव पारित करण्यात आलेला नाही. याउलट सरकारकडून जास्तीत जास्त यूपीआय आणि डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.

लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोटी खर्च, योजना बंद होणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

follow us