लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोटी खर्च, योजना बंद होणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) दर महिन्याला लाभार्थींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार असं आश्वासन महायुतीकडून (Mahayuti) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) दरम्यान लाडक्या बहींणा देण्यात आले होते मात्र आतापर्यंत लाभार्थींच्या खात्यात 2100 रुपये जमा झाले नसल्याने विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे तसेच सरकार ही योजना बंद करणार असा दावा देखील करण्यात येत आहे मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांचा दावा फेटाळून लावत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याची माहिती दिली आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलताना लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचा आमचा निर्धार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 40 ते 45 हजार कोटी रुपये खर्च आहे. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याता आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काटकसर देखील करत आहोत असं या मुलाखतीमध्ये अजित पवार म्हणाले.
मराठी भाषकांना हिंदी शिकणे सोपे
तर दुसरीकडे अजित पवार यांनी राज्यात हिंदी भाषेवरुन सुरु झालेल्या वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, हिंदी त्यात वाईट काय आहे? स्पर्धंच्या युगात मुले टिकली पाहिजे, या साठी ही तिसरी भाषा आहे. मराठी भाषकांना हिंदी शिकणे सोपे जाते. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी सक्तीवर बोलताना दिली.
अमित शाह भेट वैयक्तिक मग सरकारी तिजोरीवर भार का? अंजली दमानियांचा प्रश्न अन् अनेक चर्चांना उधाण
तसेच आज काळात एआयच्या (AI) महत्वाबाबत देखील त्यांनी भाष्य केले. यावेळी अजित पवार म्हणाले की, एआय वापर केल्याशिवाय पुढील काळात पर्याय राहणार नाही. आधी साक्षर- निरक्षर होते नंतर संगणक साक्षर आले आणि आता एआय आले आहे. एआयसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.