Gujarat Accident : गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण दुर्घटना सरखेज-गांधीनगर महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याठिकाणी आधी एक अपघात झाला होता. हा अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर आलेल्या लोकांना भरधाव वेगातील कारने चिरडल्याने ही घटना घडली.
Khalapur Landslide : मोठी दुर्घटना! खालापूरमध्ये गावावरच दरड कोसळली, १०० जण ढिगाऱ्याखाली अडकले
याबाबत अधिक माहिती अशी, एसजी हायवेवरील इस्कॉन उड्डाणपुलाव एक ट्रक आणि थार गाडीचा अपघात झाला होता. हा अपघात पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. तेवढ्यात एक भरधाव वेगातील कार आली आणि थेट गर्दीत शिरली. कारची धडक इतकी जोरात होती की अनेक लांब उडून पडले. या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 ते 12 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या मयतांमध्ये एक पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड दलाचा जवानाचाही समावेश आहे.
#WATCH | Ahmedabad, Gujarat | An accident took place at the ISKCON flyover on Sarkhej-Gandhinagar (SG) highway. pic.twitter.com/r4r9ghl3VF
— ANI (@ANI) July 20, 2023
या अपघातात कारचा चालक सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे. वेगात असलेल्या या कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोक कुठले आहेत, त्यांची काय ओळख आहे याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. या अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.