Khalapur Landslide : मोठी दुर्घटना! खालापूरमध्ये गावावरच दरड कोसळली, १०० जण ढिगाऱ्याखाली अडकले

Khalapur Landslide : मोठी दुर्घटना! खालापूरमध्ये गावावरच दरड कोसळली, १०० जण ढिगाऱ्याखाली अडकले

Irshalvadi Village Landslide : राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असून या पावसाने जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. आता रायगड जिल्ह्यात एक भयंकर दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील खालाापूर तहसील क्षेत्रातील इरसालवाडी या गावात दरड कोसळून अनेक कुटुंबे मलब्याखाली अडकून पडली आहेत. या दरडेखाली शंभरपेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 22 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. 

या गावात ५० घर होती यात साधारण २०० लोक राहत होते. मुख्य रस्त्यापासून दोन तास अंतरावर दुर्गम भागात हे गाव आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्यास सुरुवात केली आहे. काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. लोक घरात झोपेत असतानाच दरड कोसळली. त्यामुळे अनेक लोक या ढिगाऱ्याखाली दबले गेले.

मुख्यमंत्री, पालकमंत्री घटनास्थळी दाखल

या गावात जवळपास 40 घरे आहेत. ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंत्री अदिती तटकरे यांनी प्रशासनाला, मदतकार्य करणाऱ्या पथकांना महत्वाच्या सूचना दिल्या. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इरसालवाडी या गावात 40 ते 50 घरे आहेत. जवळपास तीस ते चाळीस लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

Landslide 2

मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, की या गावात जाण्यासाठी रस्ताच नाही. जी पायवाट आहे ती पावसामुळे पूर्ण चिखलात गेली आहे. बचाव पथकांनाही पायीच जावे लागत आहे. जेसीबी, पोकलेनही घटनास्थळी नेणे शक्य होत नाही. त्यामुळे बचावपथकाचे कर्मचारी हातानेच ढिगारे उपसत आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube