Download App

Gujarat Board results: SSC बोर्डाच्या परीक्षेत 157 शाळांतील सगळेच विद्यार्थी ‘फेल’, 1 लाख 96 हजार विद्यार्थ्यांना गणितात भोपळा

Gujarat Board results All students from 157 schools ‘failed’ in SSC board exam, 1 lakh 96 thousand students failed in mathematics : गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Gujarat Boards of Secondary and Higher Secondary Education) दोन दिवसांपूर्वी गुजरात बोर्ड एसएससी (Gujarat Board SSC Result) 10वीचा निकाल 2023 जाहीर केला आहे. यंदा गुजरात बोर्डाचा दहावीचा निकाल 64.62 टक्के लागला आहे. दुसऱ्या वर्षीही सुरत जिल्हा उत्तीर्णतेच्या टक्केवारीत अव्वल स्थानी आहे. सुरतचा सर्वाधिक 76 टक्के निकाल लागला आहे, तर दाहोद जिल्ह्याचा निकाल फारच कमी लागला आहे. दाहोदचा अवघा 40.75 टक्के निकाल लागला आहे.

या निकालानंतर गुजरातचे विकासाचे मॉडेल किती भंपक आहे, याचा अंदाज येऊ शकतो. विशेष म्हणजे गुजरातमध्ये सलग 25 वर्षे भाजपची सत्ता आहे.

गुजरात बोर्डाच्या एसएससी परिक्षेच्या निकालानुसार, 6111 विद्यार्थी A1 श्रेणीसह, 44480 विद्यार्थी A2 श्रेणीसह आणि 127652 विद्यार्थी B2 श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत. तर 96, 000 विद्यार्थी गुजरातीमध्ये आणि 1 लाख 96 हजार विद्यार्थी मूलभूत गणितात नापास झाले.

New Parliament Building : संसदेच्या बांधकामात महाराष्ट्र, गुजरातचे खास योगदान, वाचा स्पेशल फॅक्ट्स

राज्यातील 272 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर 1084 शाळांचा निकाल हा 30 टक्क्यांपेक्षा कमी लागल्याची नोंद झाली आहे. तर तब्बल 157 शाळांमध्ये बोर्डाची परीक्षा देणारा एकही विद्यार्थी पास झाला नाही.

परीक्षेला पुन्हा बसलेल्या 165690 विद्यार्थ्यांपैकी केवळ 27446 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

विद्यार्थी gseb.org या अधिकृत वेबसाइटवर इयत्ता 10वीचा निकाल 2023 पाहू शकतात. निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी उमेदवारांना वेबसाईट लॉग इन करून आपला आसन क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

Tags

follow us