Vijay Rupani Shradhanjali Sabha BJP Refused Expenses : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कार आणि श्रद्धांजली सभेबाबत वाद निर्माण झाला आहे. वृत्तानुसार, भाजपने अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व खर्च देण्यास नकार दिला. हा भार रुपाणी कुटुंबावर टाकला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंतिम प्रवासात वाहनांची सजावट, शहराची सजावट, बॅनर-पोस्टर आणि शोकसभेचा एकूण खर्च सुमारे 20 लाख रुपये होता, जो रूपाणी कुटुंबानेच केला आहे.
जून 2025 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या एका दुःखद विमान अपघातात विजय रुपाणी (Vijay Rupani) यांचे निधन झाले. अपघाताची बातमी कळताच संपूर्ण गुजरातमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या सन्मानार्थ, राजकोटमध्ये अंत्ययात्रा काढण्यात (Gujarat) आली. शोकसभेचे आयोजन करण्यात आले. हजारो लोक त्यांच्या लाडक्या नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी आले (Shradhanjali Sabha) होते. परंतु, आता अंत्यसंस्कार आणि शोकसभेच्या (BJP) खर्चाच्या वादामुळे संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग मिळाला आहे.
रुपानी यांच्या पत्नी अंजली रुपानी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या पतीने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्ष आणि संघटनेची सेवा केली. अशा परिस्थितीत त्यांच्या अंत्ययात्रेचा आणि श्रद्धांजली सभेचा संपूर्ण खर्च पक्षाकडून उचलला जाईल अशी अपेक्षा होती. परंतु, उलट, संपूर्ण भार कुटुंबावर लादण्यात आला, जे खूप दुःखद आहे. या वादामुळे पक्षातही अस्वस्थ परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री आणि गुजरात भाजप अध्यक्ष सी.आर. पाटील म्हणाले की, ते या प्रकरणाची चौकशी करतील. पक्षाकडून सविस्तर माहिती घेतील. पाटील यांनी कबूल केले की, रुपानी यांचे पक्ष आणि राज्यासाठी मोठे योगदान आहे. असा वाद निर्माण करणे योग्य नाही.
सूत्रांचे म्हणणे आहे की, रुपाणी कुटुंबाला अंत्ययात्रेसाठी आणि श्रद्धांजली सभेसाठी सुमारे 20 लाख रुपये द्यावे लागले होते. रूपाणी कुटुंबावर हा खर्च का लादण्यात आला? याबद्दल पक्षाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट विधान आलेले नाही. गुजरातच्या राजकारणात हा मुद्दा सतत चर्चेचा विषय राहिला आहे. विरोधी पक्षही या मुद्द्यावर भाजपला घेरत आहेत. विजय रुपाणी यांच्यासारख्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात झालेल्या खर्चावरून निर्माण झालेला वाद भाजपच्या प्रतिमेला हानी पोहोचवू शकतो, असे राजकीय वर्तुळाचे म्हणणे आहे.