Download App

पूजेचा अधिकार मिळताच हिंदू दलाने मशीद शब्द हटवला, Gyanvapi Masjid च्या बोर्डावर मंदीर शब्दाचं पोस्टर

Gyanvapi Masjid : ज्ञानवापी प्रकरणात (Gyanvapi Masjid ) बुधवारी (दि.31 जानेवारी) मोठा निर्णय आला आहे. ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू (Hindu)पक्षाला देण्यात आला आहे. हे तळघर मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला 15 दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय हिंदु दल ( Hindu Dal ) या संघटनेने काशी विश्वनाथ मंदिराच्या मार्गावर लावलेल्या साईन बोर्ड वरील ज्ञानवादी मशीदमधील मशीद हा शब्द काढून टाकत त्या ठिकाणी मंदिर या शब्दाचा पोस्टर लावलं आहे.

Sunny Leone: सनी लिओनी थिरकली ‘फना’ गाण्यावर, चाहत्यांना केले घायाळ

असं सांगण्यात येत आहे की, दोन दिवसांपूर्वीच या संघटनेने या बोर्डवर आक्षेप घेतला होता. त्यासाठी त्यांनी पर्यटन विभागाने मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी ज्ञानवापी समोरील मशीद हा शब्द काढून टाकला जावा. अशी मागणी केली होती. मात्र तळघरामध्ये पूजेचा अधिकार मिळाल्यानंतर या संघटनेने या बोर्डवरील मशिद हा शब्द हटवत मंदिरा शब्दाचे पोस्टर चिटकवले आहे.

दरम्यान ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू (Hindu)पक्षाला देण्यात आला आहे. आता येथे नियमित पूजा होणार आहे. काशी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे पूजा करण्यात येणार आहे. हिंदू पक्षाने हा मोठा विजय असल्याचे म्हटले असून 30 वर्षांनंतर न्याय मिळाल्याचा दावा केला आहे. नोव्हेंबर 1993 पर्यंत येथे पूजा केली जात होती.

Chhatrapati Sambhaji: ‘छत्रपती संभाजी’ येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या प्रकरणात हिंदूंच्या बाजूने दावा केला आहे की, नोव्हेंबर 1993 पूर्वी तत्कालीन राज्य सरकारने व्यास तळघरातील पूजा थांबवली होती. ते पुन्हा सुरु करण्याचे अधिकार दिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती. दुसरीकडे, मुस्लिम बांधवांच्या बाजूने प्रार्थनास्थळ कायद्याचा हवाला देत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावत हिंदूंच्या बाजूने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे.

follow us