Hariyana Violence : हरियाणामधी नूहमध्ये हिंसाचार घडल्यानंतर हरियाणाचे पोलिस महासंचालक पी.के. अग्रवाल (P.K. Agrwal) यांनी हिंसाचार घडवणाऱ्यांना कडक इशाराच दिला आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणारच पण मोनू मानेसरच्या व्हिडिओचीही चौकशी करणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (Hariyana Violence : SIT investigation of the violence will be done but Monu Manesar, DGP P.K. Agrwal say in the press conference)
Hariyana Violence : हिंसाचाराचं कारण बनलेला मोनू मानेसर आहे तरी कोण?
पोलिस महासंचालक अग्रवाल म्हणाले, नूहमधील हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली असून हिंसाचार प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी चौकशीही करण्यात येणार आहे. जलाभिषेक यात्रेच्या आधी मोनू मानेसरने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओची देखली चौकशी करण्यात येणार आहे.
पुढील आठ दिवसांत एसआयटी व्हिडिओची तपासणी करणार असल्याचं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं आहे. या हिंसारामागे कोणाचा हात आहे, याचा पोलिस तपास घेत असून हिंसाचाराच्या मुख्य सुत्रधारावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं अग्रवाल यांनी ठणकावून सांगितलं आहे.
हरियाणातील नूहमध्ये जलाभिषेक यात्रेदरम्यान हिंसाचार उफाळून आल्याची घटना घडलीयं. या हिंसाचारादरम्यान, दोन पोलिसांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या हिंसाराच्या घटनेनंतर परिस्थितीत नियंत्रण आणण्याचे पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. नूहसह इतर भागांत प्रशासनाकडून कर्फ्यू लावण्यात आला आहे.
दरम्यान, हिंसाचाराचं कारण मोनू मानेसर असल्याचं बोललं जात आहे. कारण मोनू मानेसरने यात्रेआधीच आपणही या यात्रेत सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मोनूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हरियाणामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतरच हा हिंसाचार घडला आहे.