Download App

सात मतदारसंघात फॅमिली वॉर! काका-पुतण्या, आजोबा अन् नातवात टफ फाईट

हरियाणातील 90 विधानसभा मतदारसंघात येत्या 5 ऑक्टोबरला मतदान (Haryana Assembly Elections) होणार आहे.

Haryana Assembly Elections : हरियाणातील 90 विधानसभा मतदारसंघात येत्या 5 ऑक्टोबरला मतदान (Haryana Assembly Elections) होणार आहे. या निवडणुकीत अपक्ष, बंडखोर आणि अन्य लहान राजकीय पक्षांच्या एन्ट्रीने चुरस निर्माण झाली आहे. काही मतदारसंघांत हाय होल्टेज लढती होण्याची शक्यता आहे. सात मतदारसंघ असे आहेत की जिथे कुटुंबातीलच सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तोशाम मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत आहे. डबवालीमध्ये भाऊ, भाऊ आणि काका, बल्लभगढमध्ये आजोबा आणि नात, रानियामध्ये आजोबा आणि नातू, अटेलीमध्ये सासरे विरुद्ध, बहादूरगढ मध्ये काका पुतण्या तर पुन्हानामध्ये चुलत भाऊच आत्मविश्वासाने एकमेकांविरूद्ध लढत आहेत.

आजोबा नातीत लढत

फरिदाबादमधील बल्लभनगर मतदारसंघात भाजप उमेदवार मूलचंद शर्मा आणि त्यांची नात काँग्रेस उमेदवार पराग शर्मा यांच्यात लढत होणार आहे. पराग शर्मा यांचे वडील माजी आमदार योगेश शर्मा मूलचंद शर्मा यांचे चुलत भाऊ आहेत. महेंद्रगढ मधील अटेली मतदारसंघात इनेलो-बसपा आघाडीचे उमेदवार ठाकूर अतरलाल यांची सून साधना मैदानात आहे. सिरसामध्ये देवीलाल परिवार दोन मतदारसंघात आमनेसामने आहेत. रानिया मतदारसंघात आजोबा रणजित चौटाला यांच्या विरोधात नातू अर्जुन चौटाला लढत आहेत. इनेलो उमेदवार अर्जुन चौटाला अभय चौटाला यांचे पुत्र आहेत.

5 लाख घरं, अग्निवीराला नोकरी, महिलांना 2100 रुपये; हरियाणासाठी भाजपानं दिल्या 20 गॅरंटी..

डबवाली मतदारसंघात चौटाला परिवारातील तीन सदस्य निवडणुकीच्या (Elections 2024) रिंगणात आहेत. इनेलोकडून आदित्य चौटाला, जजपाचे दिग्विजय चौटाला आणि अमित सिहाग काँग्रेसच्या तिकिटावर (Congress Party) निवडणूक लढवत आहेत

तोशाममध्ये काका पुतण्यात लढत

तोशाम मतदारसंघात माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांची नात श्रुती भाजपकडून तर नातू अनिरुद्ध चौधरी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. बहादूरगढ मध्ये राजेंद्र जून यांच्यासमोर राजेश जून यांचे आव्हान आहे. दोघे काका पुतण्या आहेत.

भाजपाने दिल्या वीस गॅरंटी

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनेही (Haryana Elections 2024) निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस पक्षाने (Congress Party) आपल्या जाहीरनाम्यात जनतेसाठी सात गॅरंटी दिल्या आहेत. तर भाजपने आणखी (BJP) मोठी मजल मारत तब्बल 20 गॅरंटी दिल्या आहेत. जाहीरनाम्यात म्हटले आहे की राज्यातील दोन लाख तरुणांना सरकारी नोकरी दिली जाईल. तसेच सर्व महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देणार आहोत. घर गृहिणी योजनेच्या माध्यमातून 500 रुपयांत गॅस सिलिंडर दिला जाईल. नवीन वंदे भारत रेल्वे सुरू केल्या जातील.

follow us