5 लाख घरं, अग्निवीराला नोकरी, महिलांना 2100 रुपये; हरियाणासाठी भाजपानं दिल्या 20 गॅरंटी..

5 लाख घरं, अग्निवीराला नोकरी, महिलांना 2100 रुपये; हरियाणासाठी भाजपानं दिल्या 20 गॅरंटी..

Haryana Elections 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनेही (Haryana Elections 2024) निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस पक्षाने (Congress Party) आपल्या जाहीरनाम्यात जनतेसाठी सात गॅरंटी दिल्या आहेत. तर भाजपने आणखी (BJP) मोठी मजल मारत तब्बल 20 गॅरंटी दिल्या आहेत. राज्याचा कायाकल्प करण्याचेही आश्वासन भाजपने दिले आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) म्हणाले, आम्ही 2014 मध्ये जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली. हरियाणात आमच्या सरकारने इतकी कामे केली आहेत की दिल्लीतून रोहतकला येण्यासाठी मला फक्त दीड तास लागला. यावरून स्पष्ट होत आहे की आम्ही राज्यात किती कामे केली असे नड्डा यावेळी म्हणाले.

जाहीरनाम्यात काय काय?

जाहीरनाम्यात म्हटले आहे की राज्यातील दोन लाख तरुणांना सरकारी नोकरी दिली जाईल. तसेच सर्व महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देणार आहोत.

घर गृहिणी योजनेच्या माध्यमातून 500 रुपयांत गॅस सिलिंडर दिला जाईल. नवीन वंदे भारत रेल्वे सुरू केल्या जातील.

ग्रामीण भागातील प्रत्येक महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूटी मोपेड देणार आहोत. हरियाणा राज्याला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

ओबीसी प्रवर्गातील उद्योजकांसाठी 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणार. हरियाणातील सर्व अग्निवीर जवानांना सरकारी नोकरीत सामावून घेणार.

महिलांना दोन हजार रुपये, 25 लाखांपर्यंत मोफत उपचार, विधानसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

24 प्रकारच्या शेती पिकांची एमएसपीद्वारे खरेदी केली जाणार. ऑलिम्पिक खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात ट्रेनिंग सेंटर सुरू करणार. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना पाच लाख पीएम आवास उपलब्ध करून देणार.

राज्यातील सरकारी दवाखान्यांत डायलिसीसची सुविधा मोफत देणार. डीए आणि पेन्शनला जोडणाऱ्या शास्त्रीय फॉर्म्यूल्याच्या आधारावर सर्व प्रकारच्या सामाजिक मासिक पेन्शन योजनेत वाढ करणार. केंद्र सरकारच्या सहकार्याने फरीदाबाद ते गुरुग्राम दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस मेट्रो रेल्वेसेवा सुरू करणार.

दिल्ली ते रोहतक, पानीपत, पलवल, धारूहेडा दरम्यान रॅपिड रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार. दक्षिण हरियाणात जागतिक दर्जाचे अरावली जंगल सफारी पार्क तयार करणार.

चिरायु आयुष्मान योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचार देणार. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्ध व्यक्तींसाठी आणखी पाच लाख रुपयांच्या निधीची व्यवस्था करण्याचे आश्वासन सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे.

58 वर्षे, 13 निवडणुका अन् 117 आमदार.. अपक्ष ठरलेत हरियाणात किंगमेकर!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube