Haryana Elections : हरियाणात ‘आप’कडून 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Haryana AAP Candidate List : हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly Elections) आप (AAP) काँग्रेससोबत युती करणार असल्याची चर्चा सुरू असतांनाच आपने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जाहीर झालेल्या पहिल्या यादीत एकूण 20 उमेदवारांची नावे आहेत. आम आदमी पार्टीने रोहतकमधून विजेंदर हुडा यांना उमेदवारी दिली आहे.
बोगस प्रमाणपत्रांचे पेव! पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे मनपाचे अधिकारी रडारवर, 6 जणांची होणार चौकशी
📢Announcement 📢
The Party hereby announces the following candidates for the state elections for Haryana Assembly.
Congratulations to all 💐 pic.twitter.com/Ulca3eVppu
— AAP (@AamAadmiParty) September 9, 2024
हरियाणात आम आदमी पार्टी काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. सोमवारी सकाळी ‘आप’ने काँग्रेसला सांगितले होते की, काँग्रेसने संध्याकाळपर्यंत युतीडीबाबत निर्णय घेतला नाही तर आम्ही आमची यादी जाहीर करू. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून आघाडीबाबत कोणतेही संकेत न मिळाल्याने आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केल्याचे स्पष्ट झालं. ‘आप’ने 20 जागांसाठी उमेदवार जाहीर केले.
Haryana Elections : हरियाणात ‘आप’कडून 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
‘आप’ने नारायणगढमधून गुरपाल सिंग, कलायतमधून अनुराग ढांढा, पुंडरीमधून नरेंद्र शर्मा, घरौंदामधून जयपाल शर्मा, असंधमधून अमनदीप जुंडला, समलखामधून बिट्टू पहेलवान, उचाना कलांमधून पवन फौजी, डबवालीतून कुलदीप गडराना, रनियामधून हॅपी रनिया, भविनामदून इंदू शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली. तर मेहममधून विकास नेहरा आणि रोहतकमधून विजेंदर हुडा यांना मैदानात उतरवले आहे.
भाजप-काँग्रेसकडूनही यादी जाहीर
याआधी भाजप आणि काँग्रेसनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्याचवेळी काँग्रेसने रविवारी रात्री उशिरा दुसरी यादी जाहीर केली. या यादीत कॉंग्रेसने एकूण 41 उमेदवारांची घोषणा केली आहे.
हरियाणात कधी होणार निवडणुका?
हरियाणातील विधानसभेच्या सर्व 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार असून 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. आधी 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार होते आणि 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार होती, मात्र दीर्घ सुट्टीचे कारण देत तारीख वाढवण्यात आली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर आहे.