Download App

हा भाजपचा माईंड गेम; आकडेवारी अपडेट होत नाही; हरियाणा निकालावरून काँग्रेसचा आयोगावर गंभीर आरोप

आतापर्यंत मतमोजणीच्या 11 ते 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवला जात आहे.

  • Written By: Last Updated:

Haryana Election Result 2024 : हरियाणा विधानसभा निवडणूक निकालात ट्विस्ट येताना दिसत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पार ‘झोपलेला’ भाजप आता बहुमताच्या जवळ येऊन पोहोचला आहे. त्यामुळे हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, असं दिसत आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

विनेश फोगटने मारलं राजकीय मैदान; भाजप उमेदवाराचा दारुण पराभव करत झाली आमदार

निवडणूक आयोग मतमोजणीची ताजी आकडेवारी अपडेट करत नसल्यामुळेच भाजप सध्या आघाडीवर दिसत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये, असे जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आम्ही आता त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. आतापर्यंत मतमोजणीच्या 11 ते 12 फेऱ्या पार पडल्या आहेत. पण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चौथ्या आणि पाचव्या फेरीचे निकाल दाखवला जात आहे. त्यामुळे भाजप आघाडीवर दिसत आहे. हा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले पाहिजे. स्थानिक यंत्रणांवर निवडणूक आयोगाने दबाव आणणे योग्य नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊ नये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीन ते साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रांवर थांबून राहावे. खेळ अजून संपलेला नाही. भाजप मनोवैज्ञानिक खेळ खेळत आहे. हा भाजपचा माईंड गेम आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले.

तसंच, सुप्रिया श्रीनेत यांनीही काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. निवडणूक आयोगाने मतमोजणीची आकडेवारी बराचवेळ अपडेट केलेली नाही. आमच्याकडे ग्राऊंडवरुन येणाऱ्या माहितीनुसार काँग्रेसच्या बाजूने निकाल आहेत. अंतिम आकडेवारी येईल, तेव्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झालेले असेल, असं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं आहे.

follow us