Vinesh Phogat : कुस्तीतून निवृत्ती घेऊन राजकारणात आलेल्या विनेश फोगाटच्या अडचणी (Vinesh Phogat) आणखी वाढण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (Haryana Elections) विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने विनेशला (Congress Party) जुलाना मतदारसंघातून तिकीटही दिले. विनेशकडून प्रचाराला सुरुवात केली असतानाच तिच्या अडचणीत वाढ करणारी बातमी आली आहे. राष्ट्रीय डोपिंग रोधी एजन्सीने (नाडा) विनेश फोगाटला एक नोटीस धाडली आहे. 14 दिवसांच्या आत या नोटीसीला उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. नाडाच्या नोंदणीकृत पूलमध्ये (आरटीपी) नोंदणी केलेल्या सर्व खेळाडूंना डोपिंग चाचणीसाठी केव्हा उपलब्ध असताल याची माहिती द्यावी लागते. या खेळाडूंमध्ये विनेश फोगाटही सहभागी आहे.
विनेश अन् बजरंग बनले काँग्रेसी पण, हरियाणाचा राजकीय आखाडा खेळाडूंसाठी किती सेफ?
डोपिंग चाचणीसाठी एखाद्या खेळाडूने एखादं ठिकाण सांगितलं असेल आणि तोच खेळाडू जर त्या ठिकाणी उपलब्ध राहत नसेल तर माहिती देण्यातील अपयश मानलं जाते. नाडाने नोटीसीत म्हटले आहे की विनेशने तिच्या राहण्याची ठिकाणाची माहिती दिली नाही.
विनेश फोगाट 9 सप्टेंबर या दिवशी सोनिपत येथील खरखौा गावातील तिच्या घरी डोप चाचणीसाठी हजर नव्हती. विनेशने पॅरिस ऑलिम्पिक्सनंतर कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया या दोघांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विनेश सध्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. प्रचारात व्यस्त आहे.
डोपिंग रोधी नियमानुसार डोप चाचणीसाठी एका अधिकाऱ्याला विनेश फोगाटच्या घरी पाठवण्यात आले होते. परंतु, विनेश उपस्थित नसल्याने अधिकाऱ्याला चाचणी घेता आली नाही असे या नोटीसीत म्हटले आहे. आता विनेशला नियमाचे उल्लंघन केल्याचे स्वीकारावे लागेल किंवा संबंधित ठिकाणी जवळपास एक तास हजर राहिल्याचे पुरावे द्यावे लागतील. येथे सांगावे लागेल की राहत्या जागेसंबंधी विफलता डोपिंग रोधी नियमाचे उल्लंघन नाही. जर एखाद्या खेळाडूने वर्षातून तीन वेळा या नियमाचं उल्लंघन केलं तर नाडा संबंधित खेळाडूवन आरोप लावू शकते.
पॉलिटिक्ससाठी राजीनामा! विनेश फोगाटने सोडली रेल्वेतील सरकारी नोकरी
विनेश फोगाटची राजकारणातील एन्ट्री राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणू शकतो. खाप पंचायत आणि शेतकऱ्यांचा फोगाटला असलेला पाठिंबा पाहता निवडणुकीत याचा फायदा मिळू शकतो. विनेश फोगाटला काँग्रेसने तिकीट दिलं आहे. थेट काँग्रेस मुख्यालयात येऊन तिने पक्षात प्रवेश घेतला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विनेशने राजकारणात पदार्पण केलं आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी ही घटना ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.