Download App

HDFC बॅंकेच्या अधिकाऱ्याने टार्गेटवरून कर्मचाऱ्यांना झापलं, व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर निलंबनाची कारवाई

HDFC बॅंकेच्या विभागीय अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांशी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून बॅंकेच्या अधिकाऱ्याला ट्रोल केलं जात आहे. व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांकडून विमा पॉलिसी न विकल्याने बॅंकेचा वरिष्ठ अधिकारी ओरडताना दिसत आहे. विशेष म्हणजे या ऑनलाईन बैठकीमध्ये महिला कर्मचारीदेखील आहे. हा व्हिडिओ कोलकत्ताच्याचा असल्याचं सांगितलं जात आहे. (HDFC Bank officer abuses employees in online meeting)

या व्हिडिओमध्ये बॅंकेचा अधिकारी त्याच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना एका दिवसात बॅंकेच्या 75 विमा पॉलिसी विकण्यास सांगत असल्याचं दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांकडून दिलेले टार्गेट पूर्ण होत नसल्याने बॅंकेचा हा अधिकारी कनिष्ठ कर्माचाऱ्यांसोबत असभ्य वर्तवणूक करीत असल्याचं दिसून येत आहे.

Love Jihad : महाराष्ट्रातही कडक कायदा लागू होणार, आमदार राम शिंदेंची माहिती…

दरम्यान, बॅंकेच्या जीवन विमा पॉलिसी 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ग्राहकांना विकल्या जातात. बॅंकींग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकतात. टार्गेत पूर्ण झाल्यास त्यांच्या सन्मानार्थ त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मेजवानी दिली जाते, टार्गेट पूर्ण झालं नसेल तर दंडात्मक कारवाईला समोरं जावं लागतं.

‘दादा, कार्यक्रम ऑनलाइन असता तर बरं झालं असतं’; मुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले?

मनीकंट्रोलच्या माहितीनूसार, या प्रकरणात प्राथमिक चौकशीच्या आधारावर संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून प्रकरणाची सखोल चौकशीही सुरु आहे.

मागील महिन्यात, भारताच्या मध्यवर्ती बँकेने सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी बँकांच्या संचालक मंडळासोबत गव्हर्नन्स आणि नैतिकतेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. तसेच विक्रीच्या वाढत्या घटनांबद्दल चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. दरमयान, वित्त मंत्रालयाकडून बॅंकांच्या प्रमुखांना ग्राहकांना सरळमार्गाने विमा पॉलिसी विकण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत.

Tags

follow us