Love Jihad : महाराष्ट्रातही कडक कायदा लागू होणार, आमदार राम शिंदेंची माहिती…

Love Jihad : महाराष्ट्रातही कडक कायदा लागू होणार, आमदार राम शिंदेंची माहिती…

Love Jihad : सध्याची परिस्थिती पाहता उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधात कडक कायदा लागू होणार असल्याचं संकेत भाजपचे आमदार राम शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान, अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. (Mla-ram-shinde-speak-on-love-jihad-law)

Jejuri trusteeship controversy : अहिल्यादेवींचा पुतळा बसवायला आले, विश्वस्तपदाचा वाद सोडवायला का नाही? पडळकरांचा शरद पवारांना सवाल

हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदेंचं मोठं वक्तव्य; आगामी निवडणुकीबाबत केला ‘हा’ दावा

यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, आगामी अधिवेशनात लव्ह जिहाद प्रश्नी सरकारचं लक्ष वेधणार देशातल्या चार ते पाच राज्यांत लव्ह जिहादविरोधात कायदा लागू आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हा कायदा लागून करण्याबाबत विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा झाल्याचं राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

पाठ्यपुस्तकात शिवरायांसाठी अर्ध पान राहणार नाही, छगन भुजबळांचा भाजपला टोला

तसेच विधीमंडळाच्या झालेल्या चर्चेवर राज्य सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आलं आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लव्ह जिहादविरोधात कडक कायदा लागू करण्याची गरज असल्याचं आमदार राम शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

‘ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री’; भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरबाजीवर पटोलेंचे तिरकस उत्तर

कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना लव्ह जिहादचाच प्रकार असल्याचं आरोप मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करुन घेण्यास पोलिसांकडून विलंब करण्यात आला होता. त्यामुळे कुटुंबियांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आता पोलिसांचा जलद गतीने तपास सुरु झाला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असल्याच आश्वासन देण्यात आल्याचं आमदार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, लव्ह जिहादविरोधात घडत असलेल्या घटनांवर जे पोलिस अधिकारी तक्रार दाखल करुन घेण्यासाठी विलंब करत असतील त्यांच्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

महाराष्ट्रात लव्ह जिहादची प्रकरणं समोर येत असल्याने त्यावर प्रतिबंध घालावा, यासाठी शिंदे-फडणवीस सरकार त्याविरोधात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशात जसा लव्ह जिहादचा कायदा आहे तसा महाराष्ट्रात सुद्धा लागू करावा यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर व्हावा यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube