अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदेंचं मोठं वक्तव्य; आगामी निवडणुकीबाबत केला ‘हा’ दावा
Eknath Shinde Meet Amit Shah : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. काल रात्री उशीरा ही भेट झाली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एएनआय या वृत्त वाहिनीशी बोलताना या भेटीत काय चर्चा झाली याची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली, असे ते म्हणाले.
काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah यांची भेट घेतली.
कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले… pic.twitter.com/MdLoqiPoy2
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 5, 2023
Video : गुजरात दंगल : मोदी टार्गेटवर कसे आले?
तसेच राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला आहे. यावेळी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. अमितभाईंशी या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे मंत्रीमंडळाचा निर्णय लवकरच होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
#WATCH | I and Dy CM Devendra Fadnavis met Union HM Amit Shah in Delhi yesterday, it was a positive meeting. Maharashtra govt is getting full support from the Centre since the day our govt has been formed. There were discussions regarding cabinet expansion and that our (BJP-Shiv… pic.twitter.com/F07Hcv8giR
— ANI (@ANI) June 5, 2023
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आगामी निवडणुकांबाबात देखील माहिती दिली. राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली
महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार, असे शिंदेंनी सांगितले.