CRIB Blood Group : जगातील माणसांच्या रक्ताचा एक गट असतो. रक्तगट तपासणी (CRIB Blood Group) केल्यानंतर त्याची माहिती मिळते. आतापर्यंत आपण जे रक्तगट ऐकत आलो आहेत त्यापेक्षा एकदम वेगळा रक्तगट शोधला गेला आहे. तुम्ही कधी CRIB या रक्तगटाचं नाव ऐकलं आहे का? नाही ना पण या नव्या आणि अनोख्या रक्तगटाची महिला भारतात आढळली आहे.
कर्नाटक येथील एका 38 वर्षीय महिलेच्या रक्तगटाने जगालाच चकीत केलं आहे. या महिलेचा ब्लडग्रुप जगातील अन्य रक्तगटांच्या तुलनेत वेगळा आहे. या महिलेच्या रक्तात एक युनिक एंटीजन सापडला आहे. याला अधिकृतपणे CRIB ब्लडग्रुप असे नाव दिले आहे. या महिलेला ज्यावेळी दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यावेळी तिच्या रक्ताची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये O+ टाइप केले गेले जो सर्वात सामान्य रक्तगट आहे. पण ज्यावेळी हा ब्लडग्रुप अन्य कोणत्याही O+ युनिटशी जुळला गेला नाही तेव्हा मात्र सगळेच चकीत झाले.
शस्त्रक्रियेआधी या महिलेचा ब्लड ग्रुप ORh+ असा सांगण्यात आला होता. पण ज्यावेळी या महिलेला O Positive डोनर रक्त देण्यात आले त्यावेळी सर्व युनिट्सचे रिजल्ट निगेटिव्ह आले. हा प्रकार सामान्य नक्कीच नाही असे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी या महिलेचे रक्त तपासणीसाठी Rotary Bangalore TTK Blood Centre येथे त्यानंतर UK च्या International Blood Group Reference Laboratory (IBGRL) येथे पाठवण्यात आले.
सावधान! बिस्कीटांचं सेवन ठरतंय घातक; जाणून घ्या, बिस्कीटांचे दुष्परिणाम
या महिलेच्या कुटुंबातील 20 सदस्यांची रक्त तपासणी देखील महिलेच्या रक्तगटाशी मॅच होऊ शकली नाही. यावरून सिद्ध झाले की या महिलेचा ब्लड ग्रुप आतापर्यंत जगात कुठेही नोंद झालेला नाही. यावर आणखी सखोल तपासणी करण्यात आली यासाठी तब्बल 10 महिने लागले. शेवटी एका नव्या घटकाची माहिती मिळाली या घटकाला CRIB नाव देण्यात आले. CR चा अर्थ Cromer तर IB चा अर्थ India Bangalore शी संबंधित आहे.
या महिलेचा ब्लडग्रुप अतिशय दुर्लभ आहे. हा ब्लडग्रुप शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच शोधून काढला आहे. डॉक्टरांनी या ब्लडग्रुपला पॅनरिएक्टिव्ह कॅटेगरीत ठेवण्यात आले आहे. कारण हा ब्लडग्रुप अन्य कोणत्याही ब्लडग्रुपशी मॅच करत नाही. डॉक्टरांचे म्हणणे आहे की या महिलेला भविष्यात जर पुन्हा रक्त देण्याची वेळ आली तर त्यावेळी अन्य रक्तदात्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. या महिलेला आधीच तिचे रक्त ऑटोलॉगस ट्रान्सफ्यूजनच्या माध्यमातून स्टोअर करुन ठेवावे लागणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीला मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल ज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी डॉक्टर काही दिवस आधी या व्यक्तीच्या शरीरातील रक्त काढून स्टोअर करतात. नंतर ऑपरेशनवेळी रक्ताची गरज पडली तर दुसऱ्या व्यक्तीचे रक्त घेण्याऐवजी हेच स्टोअर केलेले रक्त वापरता येते.
सावधान! स्मोकिंग न करताही होतोय ‘हा’ कॅन्सर, अहवालाने वाढली धाकधूक; वाचा सविस्तर..