Download App

देशभरात हायअलर्ट! पाकिस्तानातून 3 दहशतवादी भारतात घुसले; मोठ्या हल्ल्याचा कट, यंत्रणा सावध

Terrorists Entered India From Pakistan : भारताच्या सुरक्षा यंत्रणांना मोठी झटका देणारी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील (Pakistan) दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन दहशतवादी (Terrorists) नेपाळमार्गे भारतात प्रवेश केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. यानंतर बिहारसह संपूर्ण देशभरात उच्च सतर्कता जारी करण्यात आली आहे.

बिहार पोलिस मुख्यालयाने या तिन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रे व ओळखपत्रीय माहिती प्रसिद्ध (Terrorists Entered India From Pakistan) केली आहे. मिळालेल्या तपशीलानुसार –

मोहम्मद उस्मान – पाकिस्तानच्या बहावलपूरचा रहिवासी
आदिल हुसैन – उमरकोटचा रहिवासी
हसनैन अली अवान – रावळपिंडीचा रहिवासी

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात हे तिन्ही जण काठमांडूमध्ये पोहोचले आणि त्यानंतर बिहारमार्गे भारतात घुसले, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

“आंदोलनाला फक्त एक दिवसाची परवानगी देऊन मुख्यमंत्र्यांनी..”, जरांगेंचा फडणवीसांना रोखठोक इशारा

देशभरात हाय अलर्ट

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण रंगत असताना, महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, राज्य पोलीस दल आणि गुप्तचर विभाग सर्वच उच्च सतर्कतेवर आहेत. तिघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असून, कुठेही संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विशेष हेल्पलाइन क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

India on US Tariff : टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; कॉटन इम्पोर्ट तीन महिने ड्युटी फ्री!

सर्च ऑपरेशन सुरू

अलिकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात अनेक निरपराध भारतीयांना प्राण गमवावे लागले. त्या घटनेच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत, अशा वेळी पाकिस्तानमार्गे पुन्हा तीन दहशतवादी भारतात घुसल्याने खळबळ उडाली आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर गोळीबार केल्याची संतापजनक माहिती समोर आली होती. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही दहशतवादी भारतात मोठ्या कटाची आखणी करण्याच्या उद्देशाने आले आहेत. त्यामुळे सध्या सीमाभागात आणि संवेदनशील शहरांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. नेपाळ सीमेवरही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारताची भूमिका

पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने यापूर्वी ऑपरेशन सिंदूरसह विविध मोहीमा राबवून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र नेपाळमार्गे झालेल्या घुसखोरीनंतर सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. सध्या संपूर्ण देश सणासुदीच्या उत्साहात असताना, या धोकादायक माहितीने प्रशासनाला सतर्कतेच्या स्थितीत आणले आहे. कोणत्याही परिस्थितीत या तिघांना शोधून काढणे आणि त्यांचा कट उधळून लावणे, हेच सध्या सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख ध्येय ठरले आहे.

 

follow us