High Court : पती आणि पत्नीच्या घटस्फोटाचं भांडण कोर्टात गेलं. या प्रकरणात इलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. पत्नीची मद्यपान करण्याची सवय तोपर्यंत क्रूरता ठरू शकत नाही जोपर्यंत पत्नी नशेच्या आहारी जाऊन पतीविरुद्ध अयोग्य वर्तणूक करत नाही. या प्रकरणात पती आणि पत्नी अनेक वर्षांपासून विभक्त राहत आहेत. अशा परिस्थितीत परित्यागाच्या आधारावर न्यायालयाने त्यांना घटस्फोटाची परवानगी दिली.
खरतंर पतीने दावा केला होता की त्याची पत्नी मद्यपान करत असते. तसेच न सांगता मित्रांसमवेत वेळ व्यतित करत असते. यानंतर पतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मद्यपान करणे म्हणजे कोणती क्रूरता नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. जोपर्यंत नशेच्या आहारी जाऊन पत्नी काही चुकीची वर्तणूक करत नाही तोपर्यंत मद्यपान करणे क्रूरता ठरू शकत नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केलं. पतीने यासाठी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत ज्यावरून सिद्ध होऊ शकेल की दारूच्या नशेत पत्नी त्याच्याशी चुकीची वर्तणूक करते असेही न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.
पूजा खेडकर यांना दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला
याचिकाकर्त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पतीने पत्नीवर क्रूरतेची वागणूक आणि त्याला सोडून गेल्याचे आरोप लावले होते. यामुळे पत्नीपासून घटस्फोटाची मागणी पतीने केली होती. या प्रकरणात न्या. विवेक चौधरी आणि न्या. ओमप्रकाश शुक्ला यांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. क्रूरता आणि परित्याग दोन्ही प्रकरणे एकदम वेगळी आहेत असे न्यायालयाने सांगितले. कोर्टात असा कोणताही युक्तिवाद झाला नाही ज्यावरून दारू पिणे क्रूरता आहे असे सिद्ध होऊ शकेल.
दरम्यान, लग्न होऊन एक वर्ष झाल्यानंतर दोन्ही एकमेकांपासून विभक्त होऊन स्वतंत्र राहू लागले. याचिकाकर्ता पतीने सन 2015 मध्ये मॅट्रिमॉनियल साइटच्या माध्यमातून लग्न केलं होतं. 2016 मध्ये त्याची पत्नी मुलासह तिच्या घरी निघून गेली. तेव्हापासून दोघे स्वतंत्र राहत आहेत. यानंतर न्यायालयाने परित्यागाच्या आधारावर घटस्फोटासाठी परवानगी दिली आहे.
स्थलांतरित कामगारांच्या रोजगार वाढसाठी का काम करत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल