पूजा खेडकर यांना दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला…

  • Written By: Published:
पूजा खेडकर यांना दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला…

Pooja Khedkar : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आज सुनावली झाली. सोमवारी दिल्ली उच्च न्यायालय ( Delhi High Court) खेडकर यांना UPSC अर्जात खोटी माहिती भरल्याचा आरोप करत अटकपूर्व जामीन नाकारला.

पूजा खेडकर यांच्याविरोधात अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. नावट प्रमाणपत्राच्या आधारे आयएएस पद मिळवल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध केंद्रीय लोकसेवा आयोगाने फसवणुकीचा तक्रार दाखल केली होती. यूपीएससीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पूजा खेडकरांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे पोलीसांकडून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यानंतर पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

पूजा खेडकर यांना दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला… 

दरम्यान, आज या अर्जावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, पूजा खेडकरने षडयंत्र रचून देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवली आहे.

होम लोन घेताय? मग, बँका कोणते चार्जेस घेतात हेही जाणून घ्या अन् व्हा हुशार! 

न्यायालयाने म्हटले आहे की, खेडकर यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हा मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. खेडकर ह्या नियुक्तीसाठी अपात्र असल्याचंही न्यायालयाने म्हटलं. खेडकर यांनी केलेली फसवणूक हे फसवणुकीचे उत्तम उदाहरण संबोधून न्यायालयाने म्हटले की, ही केवळ प्राधिकरणाचीच नव्हे तर संपूर्ण देशाची फसवणूक आहे. त्यामुळे कोर्ट त्यांना अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळत आहे.

दरम्यान, बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएएस पद मिळवल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर होता. त्यांनी 12 वेळा नाव स्वत:च्या नावात फेरफार करून परीक्षा दिल्याचं तपासात समोर आले होतं. खेडकर यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अपंगत्वाचे खोटे दावे करणे, नाव आणि आडनाव बदलणे आणि परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ओबीसी प्रमाणपत्रांमध्ये फेरफार करण्याचे अनेक आरोप आहेत.

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube