Himachal Floods: हिमाचल प्रदेशमधून (Himachal Pradesh) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील उना (Una) येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी जेजो नाल्यात इनोव्हा कार (Innova Car) वाहून गेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
माहितीनुसार, इनोव्हा कारमध्ये 11 जण होते त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण अद्याप बेपत्ता असून एकाला वाचवण्यास यश मिळाला आहे. माहितीनुसार, हिमाचल प्रदेशातील प्रवासी पंजाबमधील नवानशहर येथे एका लग्न समारंभात जात होते. मात्र अचानक जेजेजवळील नाल्यात पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने ही दुर्घटना झाली आहे.
हिमाचल के ऊना में पानी के तेज बहाव में यात्रियों से भरी गाड़ी बह गई। 9 लोगों की मौत हो गई। वहीं एक व्य pic.twitter.com/A9SXeUbzya
— Himani Sharma (@hennysharma22) August 11, 2024
यावेळी इनोव्हा चालकाने कार दरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र कार पाण्यात वाहून गेली. हे सर्व लोक देहळा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. नवांशहर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने 9 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत तर एकाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास देखील सुरू केला आहे.
मोठी बातमी! बांग्लादेशात सैन्याच्या वाहनावर जमावाचा हल्ला; जवानांसह 15 जखमी
माहितीनुसार, देहलण गावातील दीपक भाटिया यांचा मुलगा सुरजीत भाटियान हे त्यांच्या इनोव्हा कारमधून नातेवाईक व इतर नातेवाईकांसह नवांशहर येथे एका लग्न समारंभात जात होते मात्र जेजेजवळील नाल्यात पावसाच्या पाण्याचा प्रवाह जोरदार वाढल्याने इनोव्हा चालकाने वाहन दरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने इनोव्हा वाहून गेली.
स्थानिक लोकांनी गाडीमधून एकाला गाडीतून सुखरूप बाहेर काढले मात्र इतर दहा जणांना वाचवता आले नाही. 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर एका व्यक्तीचा शोध सुरू आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांची नावे
दीपक भाटिया, सुरजीत भाटिया यांचा मुलगा, लोअर डेहलन येथील रहिवासी.
गुरदास राम यांचा मुलगा सुरजित भाटिया
परमजीत कौर पत्नी सुरजित भाटिया
सरूप चंद
आंटी बाईंडर
शिन्नो
भावना (18) दीपक भाटिया यांची मुलगी
अंजू (20) दीपक भाटिया यांची मुलगी
हरमीत (12) दीपक भाटिया यांचा मुलगा