Earthquake : हिमाचल प्रदेश भूंकपाने हादरला; चंबामध्ये 5.3 रिश्टर स्केलचे धक्के…

Earthquake : हिमाचल प्रदेश भूंकपाने हादरला; चंबामध्ये 5.3 रिश्टर स्केलचे धक्के…

Earthquake Himachal Pradesh : देशातील हिमाचल प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील चंबामध्ये भूकंपाचे तीव्र धक्के (Earthquake Himachal Pradesh) बसल्याची बातमी समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाच्या धक्क्यामुळे अद्याप तरी कोणत्या प्रकारची जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली असल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, भूकंपाच्या या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

रात्री साडेऊनच्या सुमारास चंबा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. चंबा परिसरात फारशी मानवी वस्ती नाही. त्यामुळे या भूकंपाच्या धक्क्यांनी कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी हिमाचल प्रदेशात 1 एप्रिल 1905 रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपात तब्बल 1000 लोकांचा बळी गेला होता. हिमालच प्रदेशातील चामोली, लाहौल आणि स्पिती परिसरात हा तीव्र क्षमतेचा भूकंप झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube