ब्रेकिंग! तिबेटमध्ये भूकंपामुळे विध्वंस; 95 अधिक नागरिकांचा मृत्यू; अनेक जखमी

ब्रेकिंग! तिबेटमध्ये भूकंपामुळे विध्वंस; 95 अधिक नागरिकांचा मृत्यू; अनेक जखमी

Earthquake In Nepal Powerful Strike In Tibet : तिबेटमध्ये मंगळवारी (दि.7) सकाळी बसलेल्या 7.1 रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे आतापर्यंत 95 लोक ठार झाले आहेत. तर, 130 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तिबेटला बसलेल्या या भूकंपाचे धक्के शेजारील देश भारत, नेपाळ आणि भूतानमधील अनेक भागातही जाणवले. भूकंपाची तीव्रता लक्षात घेता यात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘SIT’ ला मोठे यश, आरोपींनी डिलीट केलेला ‘तो’ व्हिडिओ मिळाला

सकाळी 6.52 च्या सुमारास भूकंप झाला. नेपाळमधील काठमांडू, धाडिंग, सिंधुपालचौक, कावरे, मकवानपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारतातील अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, मात्र भारतातून अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने जारी केलेल्या वेगळ्या माहितीनुसार, भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन नात्याचा प्रवेश होईल

बिहार, सिक्कीम, आसाम आणि उत्तर बंगालसह भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारमधील मोतीहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुझफ्फरपूर या जिल्ह्यांमध्ये सकाळी 6.40 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. मालदा आणि सिक्कीमसह उत्तर बंगालच्या काही भागात भूकंप सुरूच आहे. पाच सेकंद पृथ्वी हादरत राहिल्याचे बोलले जात आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर पडू लागले.

सध्या दिल्ली एनसीआरमध्ये सातत्याने भूकंप होत आहेत. आपली पृथ्वी सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेली आहे. या प्लेट्स त्यांच्या जागी सतत फिरत राहतात. कधीकधी त्यांच्यात संघर्ष किंवा घर्षण होते. त्यामुळे आपण भूकंप अनुभवतो. भूकंपाच्या तीव्रतेमुळे मोठा विध्वंस होण्याचा धोका कायम आहे. सोशल मीडियावर नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, यामध्ये पृथ्वी हादरताना दिसत आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे भारतात जीवित वा वित्तहानी
झाल्याचं वृत्त नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube