ब्रेकिंग : भारतानंतर आता निसर्गानं दिला पाकला दणका; तीव्र भूंकपाने जमीन हादरली

Earthquake In Pakistan : दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरने (Operation Sindoor) पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. या दणक्यातून पाकिस्तान सावरत नाही तोच आता निसर्गानेदेखील पाकिस्तानला दणके देण्यास सुरूवात केली असून, 4.6 एवढ्या रिस्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तानातील काही भागातील जमीन हादरली आहे. यात नेमकं किती नुकसान झालयं किंवा जीवितहानी झाली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भूकंपाची (Earthquake) तीव्रता ४.६ आणि खोली १० किलोमीटरपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. या आठवड्यात पाकिस्तानमध्ये हा तिसरा भूकंप आहे.
"EQ of M: 4.6, On: 12/05/2025 13:26:32 IST, Lat: 29.12 N, Long: 67.26 E, Depth: 10 Km, Location: Pakistan," posts National Center for Seismology (@NCS_Earthquake). pic.twitter.com/F34yGzdDCq
— Press Trust of India (@PTI_News) May 12, 2025
आठवडाभरात तिसऱ्यांदा हादरलं पाकिस्तान
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार(NCS), भूकंपाचे केंद्र पाकिस्तानमध्ये २९.१२ अंश उत्तर अक्षांश आणि ६७.२६ अंश पूर्व रेखांशावर १० किलोमीटर खोलीवर नोंदवले गेले. यापूर्वी ५ आणि १० मे रोजीही पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. गेल्या एका आठवड्यात हा तिसरा भूकंप आहे.
रिश्टर स्केलची तीव्रता १ ते ९ पर्यंत असते. भूकंपाची तीव्रता त्याच्या केंद्रावरून म्हणजेच केंद्रबिंदूवरून मोजली जाते. म्हणजेच त्या केंद्रातून निघणारी ऊर्जा या प्रमाणात मोजली जाते. १ म्हणजे कमी आणि ९ म्हणजे सर्वात जास्त तीव्रतेचा भूकंप म्हणून मोजला जातो. जर रिश्टर स्केलवर तीव्रता ७ असेल तर, ४० किलोमीटरच्या त्रिज्येत जोरदार भूकंप होतो.
Video : ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी; पुढील मिशनसाठी लष्करी तळ, सिस्टम रेडी; पाकला भारताचा मोठा मेसेज
किती तीव्रतेचा भूकंप मानला जातो धोकादायक?
भूकंप किती धोकादायक असतो हे त्याच्या रिश्टर स्केलवर मोजले जाते.
– ० ते १.९ तीव्रतेचे भूकंप फक्त भूकंपमापकानेच शोधता येतात.
– जेव्हा २ ते २.९ तीव्रतेचा भूकंप होतो तेव्हा हलके हादरे बसतात.
– जेव्हा ३ ते ३.९ तीव्रतेचा भूकंप होतो तेव्हा जणू जवळून ट्रक गेल्यासारखे वाटते.
– ४ ते ४.९ तीव्रतेच्या भूकंपात खिडक्या तुटू शकतात. तसेच भिंतींवर फ्रेम्स पडू शकतात.
– ५ ते ५.९ तीव्रतेच्या भूकंपात घरातील फर्निचर हादरू शकते.
– ६ ते ६.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे इमारतींचे पाया तुटू शकतात आणि वरच्या मजल्यांचे नुकसान होऊ शकते.
– ७ ते ७.९ तीव्रतेचा भूकंप झाल्यास इमारती कोसळतात.
– ८ ते ८.९ तीव्रतेच्या भूकंपात केवळ इमारतीच नाही तर, मोठे पूलही कोसळू शकतात.
– ९ किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात विनाश होतो. त्सुनामीही येऊ शकते.