Download App

Share Market घसरणीचा फटका, श्रीमंताच्या यादीत Adani टॉप २० तर Ambani टॉप १०च्या बाहेर

  • Written By: Last Updated:

Hindenburg Research हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे गौतम अदानींच्या (Gautam Adani) साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. तो धक्का अजूनही सावरला जात नाही, प्रत्येक दिवस त्याच्या संपत्तीत मोठी घसरण आणत आहे. ताज्या माहितीनुसार गौतम अदानी जगातील सर्वाधिक 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

२४ तासात १६व्या क्रमांकावरून २१ व्या स्थानी

गौतम अदानी गुरुवारी 64.7 अब्ज डॉलर्ससह जगातील श्रीमंतांच्या यादीत 16 व्या क्रमांकावर होते आणि अवघ्या 24 तासांत ते आणखी पाच स्थानांनी घसरून 21 व्या क्रमांकावर आले आहेत. 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या अदानी यांच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत वाईट ठरत आहे.

मुकेश अंबानीही टॉप-10 च्या बाहेर

अदानी ग्रुपच्या घसरणीनंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे ते आता टॉप 20 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर गेले आहेत. पण त्याचवेळी टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेले दुसरे भारतीय अब्जाधीश आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही घसरण झाली आहे आणि ते टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर गेले आहेत.

हेही वाचा : Gautam Adani यांना मोठा धक्का ! श्रीमंतांच्या यादीतून टॉप-20 च्याही बाहेर

गेल्या २४ तासांत एका दिवसात ६९५ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाल्यामुळे मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $८०.३ अब्ज इतकी खाली आली आहे आणि एवढ्या संपत्तीसह ते ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या अहवालात १२व्या स्थानावर पोहोचले आहेत. मात्र, संपत्तीच्या बाबतीत गौतम अदानी यांना मागे टाकून मुकेश अंबानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

Tags

follow us