Budget 2026 : उच्च शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतीगृहे तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. तसेच आत्मनिर्भर भारतासाठी 2 कोटींचं टॉपअप देण्यात येणार असल्याची माहिती देखील निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
तर दुसरीकडे येणाऱ्या पाच वर्षात 20 नवे जलमार्ग सुरु करणार असल्याची घोषणा देखील अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी केली आहे. वाराणसी, पाटण्यात जहाजबांधणी केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई- पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार
मुंबई-पुणे हायस्पीड कॉरिडोर सुरु करणार असल्याची घोषणा देखील निर्मला सीतारमण यांच्याकडून करण्यात आली आहे. याचबरोबर 7 नवीन हायस्पीड रेल्वे सुरु करणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.
अजित पवारांच्या अपघातप्रकरणी मोठी बातमी, विमान कंपनीबद्दल धक्कादायक माहिती उघड
कर्करोग आणि मधुमेहाची औषधे स्वस्त होणार
अर्थसंकल्पीय भाषणात कर्करोग आणि मधुमेहाची औषधे स्वस्त होणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. देशातील बायोफार्मास्युटिकल क्षेत्राच्या विकासामुळे कर्करोग आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांवरील औषधं स्वस्त होतील असं त्यांनी म्हटले आहे.
मंदिरांसाठी 5000 कोटी रुपयांची तरतूद
तर दुसरीकडे मंदिरांसाठी 5000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची देखील माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. याचा फायदा टियर 2 आणि 3 मधील शहरांना होणार
