Budget 2026 : अर्थसंकल्पापूर्वी निर्मला सीतारमण यांचा ‘बजेट लूक’ चर्चेत; जांभळ्या रंगाचा संदर्भ काय?
यापूर्वी, 2025 च्या अर्थसंकल्पादरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारच्या मधुबनी कलाकृतीने सजवलेली ऑफ-व्हाइट सिल्क साडी परिधान केली होती.
Nirmala Sitharaman Budget Saree : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (दि.) सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प 2026२-27 सादर करत आहेत. अर्थसंकप्ल सादर करण्याचे हे सीतारमण यांचे सलग नववे वर्ष आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी निर्मला सीतारमण यांची साडी नेहमीच चर्चेत असते. खरं तर, अर्थसंकल्पाच्या निमित्ताने निर्मला सीतारमण यांनी परिधान केलेली साडी भारताच्या संस्कृतीचे प्रतिबिंबित करते. यंदाच्याअर्थसंकल्पासाठी सीतारमण यांच्यासाडीचे वैशिष्ट्ये काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया..
जांभळा रंग काय सांगतो?
यंदाच्या सादर होणाऱ्या बजेटसाठी अर्थमंत्र्यांनी हाताने विणलेली जांभळी कांचीवरम सिल्क साडी परिधान केली असून, जी तामिळनाडूच्या प्राचीन विणकामाशी संबंधित आहे. साडीवर हलक्या सोनेरी तपकिरी रंगाचे चेक, म्हणजेच कट्टम आणि धाग्याच्या कामासह कॉफी ब्राऊन बॉर्डर आहे. जांभळा रंग महिला सक्षमीकरण, प्रतिष्ठा, न्याय आणि समानतेचे प्रतीक मानला जातो. हा रंग आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि महिला हक्क चळवळीशी देखील संबंधित आहे. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये महिलांसाठी काही विशेष घोषणा केल्या जातात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या बजेटमध्ये ‘मधुबनी आर्ट’ साडी
यापूर्वी, 2025 च्या अर्थसंकल्पादरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारच्या मधुबनी कलाकृतीने सजवलेली ऑफ-व्हाइट सिल्क साडी परिधान केली होती. ही साडी पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी त्यांना भेट दिली होती. या साडीवर आनंद, समृद्धी आणि वाढीचे प्रतीक असलेल्या माशाची रचना होती.
Nine budgets, nine handlooms: A look at Nirmala Sitharaman's iconic budget sarees
Read @ANI story | https://t.co/qTHKraf86w#nirmalasitharaman #unionbudget #budget2026 pic.twitter.com/JSt6FKxDZW
— ANI Digital (@ani_digital) February 1, 2026
निर्मला सीतारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला. त्यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. राजकारणात येण्यापूर्वी त्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होत्या. त्यांचा राजकीय प्रवास 2006 मध्ये भारतीय जनता पक्ष (भाजपा) पासून सुरू झाला. 2014 मध्ये त्यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात, त्यांनी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सांभाळला. २०१७ मध्ये निर्मला सीतारमण संरक्षण मंत्री झाल्या. 2019 पासून, निर्मला सीतारमण देशाच्या अर्थमंत्री म्हणून काम करत आहेत.
