Download App

आधार कार्ड तुमची ओळख नसेल तर ‘या’ योजनांचा लाभ कसा मिळणार?, काय आहेत सर्व नियम?

आधारकार्ड हा महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. अनेक जण या पुराव्याच्या आधारे देशात अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

  • Written By: Last Updated:

Aadhaar Card On Scheme : सर्व सरकारी कामांसाठी आधारकार्ड अत्यावश्यक दस्ताऐवज आहे. (Scheme) त्याच्याशिवाय अनेक काम होऊच शकत नाहीत. यावरून आधारकार्डचं महत्त्व अधोरेखित होतं. मात्र, मंगळवारी बिहारच्या मतदार याद्यांप्रकरणी सुरु असलेल्या एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आधारबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं. आधार हा ओळखीचा पुरावा होऊ शकत नाही. त्यातही पडताळणीनंतरच ते स्वीकारले पाहीजे.

मतदार पात्रता सिद्ध करण्यासाठी आधार पुरेसा नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायालयाने म्हटलं की, आधार कायद्यातही ते पुरावा म्हणून मानले गेलेले नाही. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. जर आधार ही आपली ओळख नसेल तर सरकारी योजनांमध्ये ग्राह्य धरलं जातं. त्याचं पुढे काय होणार? रेशनिंग कार्डपासून पेन्शन योजना ते लाडकी बहीण योजनेसाठी आधारकार्ड अनिवार्य आहे. अशा स्थितीत न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सरकारी योजनावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

US birthright citizenship : ट्रम्प यांचा आदेश लागू होण्यापूर्वी भारतीयांच्या मुलं जन्माला घालण्यासाठी रांगा

रेशनकार्ड, पेन्शन, बँक खातं, गॅस सब्सिडी, डीबीटी ट्रान्सफर, मोबाईल सीम, बँकिंग केवायसी, लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. आधार कायदा, 2016 नुसार आधार हा ओळख आणि पत्त्याचा पुरावा असू शकतो. पण कायद्याने अनिवार्य केल्याशिवाय आधार क्रमांक नसल्यामुळे कोणालाही सेवा नाकारता येत नाही. 2018 मध्ये दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आधार अनेक सरकारी योजनांमध्ये वापरता येते. परंतु सर्व सेवांसाठी ते अनिवार्य करता येत नाही.

दुसरीकडे, मुंबई हायकोर्टाने देखील एका सुनावणी दरम्यान या दस्ताऐवजबाबत महत्त्वाचं मत मांडलं आहे. न्यायालय म्हणते की आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्र हे नागरिकत्वाचा पुरावा असू शकत नाहीत. या संपूर्ण प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकत्व कायदा 1955 चा दाखला दिला आहे. हे संपूर्ण प्रकरण बांगलादेशातून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या व्यक्तीला जामीन देण्याशी संबंधित आहे.

follow us