Maharashtra Rain Alert : देशात मान्सूनची एन्ट्री झाली असून काही भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. जून महिन्यात कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. या अंदाजानुसार, देशातील अनेक भागात कमी पाऊस झाल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. तर आता जुलै महिन्यासाठी हवामान विभागाकडून नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार, जुलैमध्ये देखील देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये 94% पाऊस – हवामान विभागाचा नवा अंदाज
जुलै महिन्यात देखील कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आल्याने शेती कामात आणि जल व्यवस्थापनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा (Dr. Mrutyunjay Mohapatra) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत सुमारे 94 टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारतासाठी जुलै महिन्यासाठीचा दीर्घकालीन सरासरी पाऊस 280.4 मिमी इतका असून यंदा यात घट होण्याची शक्यता आहे.
या भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस
तर दुसरीकडे जुलै महिन्यात काही ठिकाणी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर – पश्चिम भारत, ईशान्य भारत, पूर्व – मध्य भारत आणि पूर्व द्वीपकल्पीय भारताचे काही भागात जुलैमध्ये सामन्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
पेट्रोलचे दर कमी करा नाहीतर…, डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांना धमकी-
काही ठिकाणी कमी आणि काही ठिकाणी जास्त पाऊस जुलैमध्ये होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीचे कामे सरकारी यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसारच करावे असं आवाहन देखील करण्यात आले आहे.
