Download App

जातनिहाय जनगणना कशी होणार, कोणते प्रश्न विचारले जातात? एका क्लीकवर जाणून घ्या सर्वकाही

Caste Census : केंद्र सरकारने सीसीपीए बैठकीत (CCPA Meeting) मोठा निर्णय घेत आज जातीय जनगणनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता देशात

  • Written By: Last Updated:

Caste Census : केंद्र सरकारने सीसीपीए बैठकीत (CCPA Meeting) मोठा निर्णय घेत आज जातीय जनगणनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता देशात मुख्य जनगणनेतच जात जनगणना केली जाणार आहे. देशात जातीय जनगणना (Caste Census) व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) करत होते. मात्र आता मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेत जातीय जनगणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात यापूर्वी 2021 मध्ये जनगणना होणार होती मात्र कोविडमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. देशात होणाऱ्या जनगणनेदरम्यान धर्म आणि वर्गाशी संबंधित प्रश्न देखील विचारले जातात पण यंदा तुम्ही कोणत्या समुदायाचे आहात हे देखील विचारले जाऊ शकते.

जनगणना कशी केली जाते?

देशात जनगणना करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते त्यांना प्रगणक म्हणतात. प्रगणक जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या क्षेत्रात जाताता आणि विविध प्रकारची माहिती गोळा करतात. प्रश्न विचारण्यासाठी सरकार त्यांना एक शेष प्रकारचे ओळखपत्र देते. देशाच्या जनगणनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जनगणना दोन भागात केली जाते. पहिली गृहनिर्माण आणि दुसरी गृहगणना.

गृहनिर्माण क्षेत्रात घराशी संबंधित प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये वीज, पिण्याचे पाणी, शौचालय, मालमत्ता आणि मालमत्तेचा ताबा यासंबंधी प्रश्न विचारले जातात.

जनगणनेचा दुसरा प्रकार म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी. कुटुंबातील सदस्यांशी संबंधित प्रश्न त्यात नोंदवले जातात. जे गणक विचारतो आणि ते भरत राहतो. यामध्ये अनेक प्रश्न आहेत. जसे की नाव, लिंग, आईचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती, तात्पुरता पत्ता, सध्याचा पत्ता, कुटुंबाचा प्रमुख कोण आहे आणि कुटुंबप्रमुखाशी काय संबंध आहे? जनगणना प्रक्रियेदरम्यान असे 29 प्रश्न विचारले जातात.

डेटा कसा तयार केला जातो?

जनगणनेशी संबंधित जी काही माहिती गोळा करते ती कोणत्याही खाजगी एजन्सीसोबत शेअर केली जात नाही. असा दावा सरकारकडून करण्यात येतो.  जनगणना कामगारांकडून गोळा केलेला कोणताही डेटा फिल्टर केला जातो. श्रेणींमध्ये विभागल्यानंतर, ते राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये अंतिम केले जाते. अशाप्रकारे जनगणनेचा डेटाबेस तयार केला जातो जो सरकार वापरते. भारतात जनगणना करण्याचीही तरतूद करण्यात आली. याला जनगणना कायदा 1948 म्हणून ओळखले जाते. ही तरतूद केंद्र सरकारला जनगणना करण्याचा आणि त्यासाठी नियम बनवण्याचा अधिकार देते. यासोबतच, जनगणनेचा तपशीलवार डेटा गोपनीय ठेवला जातो.

एकाच माणसाला मारू, जो लाखाच्या बरोबरीचा असेल; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पाकिस्तानला धमकी

पहिली जनगणना कधी झाली?

देशातील पहिली जनगणना 1872 मध्ये तत्कालीन गव्हर्नर-जनरल लॉर्ड मेयो यांच्या कारकिर्दीत करण्यात आली होती, परंतु संपूर्ण जनगणना 1881 मध्ये झाली.  भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1881, 1891, 1901, 1911, 1921, 1931 आणि 1941 मध्ये जनगणना करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये पहिली जनगणना करण्यात आली. त्यानंतर 1961, 1971, 1991, 2001 आणि 2011 मध्ये जनगणना करण्यात आल्या.

follow us