Rajouri Encounter :जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील कंडी भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले होते. यानंतर आता भारतीय आज सकाळी भारतीय लष्कराने पुन्हा ऑपरेशन सुरु केलं आहे. राजौरी आणि बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आला आहे. 20 एप्रिल रोजी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला करुन दहशतवाद्यांनी धूम ठोकली होती. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते.
काल जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी प्रत्युत्तरादाखल स्फोटकांचा स्फोट केला होता. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले तर चार जवान जखमी झाले होते. जखमी चार जवानांना उपचारासाठी उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यातील तीन जवानांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
20 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात सातत्याने मोहीम राबवत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सतत शोधमोहीम राबवली जात आहे. यासह बुधवारपासून खोऱ्यातील विविध भागात दहशतवाद्यांना ठार मारण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे.
Nitesh Rane : सर्वात मोठा दलाल आज बारसूमध्ये आलाय, राणे बंधूंची उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी
#WATCH | Defence Minister Rajnath Singh reaches Rajouri
5 soldiers lost their lives in an explosion during an encounter with terrorists in Rajouri yesterday. pic.twitter.com/JEU1xhx36p
— ANI (@ANI) May 6, 2023
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या भागात दहशतवादी व भारतीय सैनिकांमध्ये चकमक उडते आहे. या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी याठिकाणी भेट दिली आहे.