Hurun Global Rich List 2025 : हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. (Global ) या यादीनुसार टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची एकूण संपत्ती तब्बल १८९ डॉलर अब्जने वाढून ४२०बिलियन डॉलरवर पोहोचली. मात्र, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत १ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. या तोट्यामुळे ते ते जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.
रोशनी नाडर महिलांमध्ये पाचव्या क्रमांकावर
काही दिवसांपूर्वीच एचसीएल कंपनीच्या प्रमुख पदावर विराजमान झालेल्या रोशनी नादर जगातील पाचवी सर्वात श्रीमंत महिला झाल्या आहेत. ज्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ३.५ लाख कोटी रुपये आहे. जगातील पहिल्या १० श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणारी त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांचे वडील शिव नादर यांनी अलीकडेच एचसीएलमधील ४७% हिस्सा आपल्या मुलीच्या नावावर केला होता.
आश्चर्यच! श्रीमंत देशही कर्जबाजारी, जपान अव्वल तर अमेरिकेवरही भरमसाठ कर्ज
यादीनुसार, मुकेश अंबानी जगातील १० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर पडले असले तरी ते अजूनही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीनुसार, रिलायन्स समूहाच्या अध्यक्षांच्या संपत्तीत घट झाली आहे. कारण रिलायन्स इंडस्ट्रीजला त्यांच्या ऊर्जा आणि किरकोळ व्यवसायांनी अपेक्षित काम केलं नाही. मंद विक्री वाढ आणि कर्जाबाबत गुंतवणूकदारांच्या चिंतेमुळं समूहाच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. कंपनीने डिजिटल प्लॅटफॉर्म, नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि किरकोळ व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी पावले उचलली आहेत.
अदानी दुसऱ्या क्रमांकावर
भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गौतम अदानी हे हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५ मध्ये मुकेश अंबानींच्या नंतर आहेत. गेल्या एका वर्षात त्यांची एकूण संपत्ती सुमारे १ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. अदानी यांनी अल्पावधीत आपले साम्राज्य निर्माण केलं आहे. अदानी समूह देशातील बंदरे, वीज निर्मिती, विमानतळ, खाणकाम, अक्षय ऊर्जा, मीडिया आणि सिमेंट या क्षेत्रातील व्यवसायात गुंतलेला आहे.