Hurun India Rich List : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानींनी अदानींना टाकलं मागं; संपत्तीत 4 पटींनी वाढ

Hurun India Rich List 2023 : देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (mukesh ambani)यांनी आता गौतम अदानी (gautam adani)यांना मागं टाकलं आहे. नुकतीच हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 (Hurun India Rich List 2023)प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागं टाकलं आहे. […]

Mukesh Ambani Gautam Adani

Mukesh Ambani Gautam Adani

Hurun India Rich List 2023 : देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (mukesh ambani)यांनी आता गौतम अदानी (gautam adani)यांना मागं टाकलं आहे. नुकतीच हुरुन इंडिया रिच लिस्ट 2023 (Hurun India Rich List 2023)प्रसिद्ध झाली आहे. या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागं टाकलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती बनले आहेत. हिंडेनबर्गच्या (Hindenburg)अहवालानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.

धक्कादायक! शिक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जिवंत जाळले

Hurun India आणि 360 One Wealth यांनी एकत्रितपणे आज ‘360 ONE Wealth Hurun India Rich List 2023’ जारी केली आहे. या यादीत भारतातील 12 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती 2014 मध्ये 1,65,100 कोटी रुपयांवरुन 2023 मध्ये अंदाजे 8,08,700 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. 9 वर्षात अंबानींच्या संपत्तीत चार पटींनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

तलाठी भरती परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला होणार जाहीर, कधीपर्यंत मिळणार नियुक्तीपत्रे?

त्याचवेळी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 474,800 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह दुसऱ्या स्थानावर घसरले. तसेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पूनावाला 2,78,500 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

एचसीएलचे शिव नाडर 2,28,900 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह चौथ्या क्रमांकावर आहेत. तर 1,76,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसह गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंबाचा या यादीत समावेश आहे. यासह सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक दिलीप सांघवी 1,64,300 कोटी रुपयांसह सहाव्या क्रमांकावर आहेत.

या यादीनुसार लक्ष्मी मित्तलच्या संपत्तीमध्ये 7 टक्के वाढ झाली आहे. ते आता 1,62,300 कोटी रुपयांसह अंदाजे संपत्तीसह यादीत सातव्या क्रमांकावर आहे. या यादीत आठव्या क्रमांकावर डीमार्टचे राधाकिशन दमानी यांची संपत्ती 1,43,900 कोटी रुपये आहे. कुमार मंगलम बिर्ला कुटुंब 1,25,600 कोटी रुपयांच्या संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहे. दहाव्या क्रमांकावर बजाज ऑटो ग्रुपचे नीरज बजाज यांची संपत्ती 1,20,700 कोटी रुपयांची आहे.

Exit mobile version