धक्कादायक! शिक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जिवंत जाळले

धक्कादायक! शिक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन जिवंत जाळले

washim news : वाशिम जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी मारहाण करत जिवंत जाळले आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये शिक्षक सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे यांचा मृत्यू झाला.

शिक्षक सुनील सोनवणे हे शाळेवर जात असताना अज्ञात आरोपींनी हल्ला करुन लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आले. ही मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डी रस्त्यावर घडली.

मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर सुनील सोनवणे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. काल 9 ऑक्टेबर रोजी दुचाकीने शाळेत जात असताना कोल्ही बोर्डी रस्त्यावर अज्ञात आरोपींनी अडवून त्यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केली व अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. त्यानंतर अज्ञात आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.

Tejaswini Pandit : ‘टोल’वरुन तेजस्वीनी आक्रमक होताच, सोशल अकाउंटवर कारवाई; मनसे मदतीला…

मात्र बराच वेळ ते गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होते. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, फॉरेन्सिक पथकाने प्रत्यक्ष स्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून दोन पथकांचे गठण करण्यात आले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे जऊलका रेल्वे ठाणेदार प्रदीप राठोड यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube