IAS Pooja Khedkar : देशात सध्या आयएएस अधिकारी पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) चांगलीच चर्चा सुरु झालीयं. आयएएस बनण्यासाठी तिने दिव्यांगाचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे. या प्रकरणी केंद्र सरकाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत चौकशीही सुरु झालीयं.अशातच आता पूजा खेडकरसह अन्य पाच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाचीही चांगलीच चर्चा होत आहे. अन्य अधिकाऱ्यांचही पूजा खेडकरसोबत का नाव जोडलं जात आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
हरभजन सिंगचा ‘तो’ व्हिडिओ, प्रचंड विरोध अन् जाहीर माफी, जाणून घ्या नेमकं प्रकरण
पूजा खेडकरने दृष्टीहीन असल्याचं खोटं दिव्यांगांच प्रमाणपत्र सादर करुन दिव्यांग कोट्यातून आयएएस बनल्याचे आरोप तिच्यावर केले जात आहेत. याआधाही अनेक अधिकाऱ्यांची अशीच चर्चा होती. यामध्ये माजी आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांनी अपंग असल्याचं दाखला देत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राकडे जात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यादरम्यान सिंह यांच्याबाबतीतही अनेक उलट-सुलट चर्चा सुरु होत्या.
आसिफ उर्फ युसूफ यांनी 2016 च्या बॅचमध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आसिफ उर्फ युसूफ या प्रकरणी ते वादाच्या भोवऱ्यात होते. त्यांच्यावर मागासवर्गीय कोट्यातून चुकीचं प्रमाणपत्र सादर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावेळी केंद्र सरकारकडून त्यांच्याही चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली होती. तेव्हाही सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा सुरु होती.
हरभजन सिंगचा ‘तो’ व्हिडिओ, प्रचंड विरोध अन् जाहीर माफी, जाणून घ्या नेमकं प्रकरण
आयपीएस अधिकारी बेनीवाल यांची कन्या अनु बेनीवाल यांचंही नाव चांगलच चर्चेत आलं होतं. आयपीएस अधिकाऱ्याची मुलगी त्यात ईडब्ल्यूएस प्रवर्गातून कशी काय? असा सवाल सोशल मीडियासह सर्वत्र केला जात होता. तसेच 2014 च्या बॅचच्या अधिकारी निकीता खंडेलवाल दृष्टीहीन असल्याने दिव्यांग कोट्यातून त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र एका व्हिडिओमध्ये त्यांनी डोळ्याला चष्मा न लावता वाहन चालवण्याची टेस्ट दिल्याचं समोर आलं. तेव्हा निकीता चर्चेत आल्या.
आयएएस अधिकारी प्रियांशु खाती या 2021 च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांना सिव्हील परिक्षेत 245 वी रॅंक मिळाली होती. त्यांनी या परिक्षेसाठी आर्थो हॅंडिकॅप असल्याचं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलं होतं. प्रियांशू पूर्णपणे फिट असूनही त्यांनी दिव्यांगाचं प्रमाणपत्र सादर केलं असल्याची चर्चा त्यावेळी रंगली.