Ice Cream Man Raghunandan Kamath Passed Away : देशातील आईस्क्रीम मॅन ( Ice Cream Man ) या नावाने प्रसिद्ध असलेले नॅचरल आईस्क्रीम या आईस्क्रीम ब्रँडचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ ( Raghunandan Kamath ) यांचं निधन ( Passed Away ) झालं आहे. त्यांनी मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते नॅचरल कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवरून कामथ यांच्या निधनाची ही बातमी देण्यात आली आहे.
होय, 2004 पासूनच भाजपची युती व्हावी म्हणून आग्रह धरला होता…; पटेलांचा मोठा खुलासा
या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नॅचरल आईस्क्रीम चे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन झालं आहे. हा आमच्यासाठी अत्यंत दुःखद दिवस आहे. कामात यांचा जन्म कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यातील एका गावामध्ये झाला होता. ते सहा भाऊ-बहिणी होते. त्यांनी मुंबईत येऊन आपल्या भावाच्या रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली. मात्र काही दिवसातच त्यांनी आपला वेगळा व्यवसाय थाटला. असं या पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे.
Our thoughts on the sad demise of our patron and founder of Naturals Ice Cream, Late (Shri) Raghunandan Kamath. Indeed a very sad and unfortunate day for us.
Regards,
The Naturals Family.
Date: 18th May, 2024. pic.twitter.com/6x5guC5ae8— Natural Ice Cream (@Naturalicecream) May 18, 2024
कामथ यांच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करून देखील कामात यांनी कधी हार मानले नाही त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण सहकार्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले काम त्यांचे वडील कर्नाटकातील एक छोटे फळ विक्रेते होते. कामात देखील आपल्या वडिलांना या कामात मदत करत होते. मात्र शाळेमध्ये नापास झाल्यानंतर त्यांना आपल्या शिक्षण सोडावं लागलं.
मोठी बातमी : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त
त्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन आपल्या भावाच्या रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली. मात्र काही दिवसातच त्यांनी आपला वेगळा व्यवसाय थाटला. 1984 ला चार कर्मचारी आणि दहा आईस्क्रीम फ्लेवर अशा पायावर नॅचरल आईस्क्रीम उभारण्यात आलं. ज्यामध्ये केवळ फळ, दूध आणि साखरेचा वापरकरून आईस्क्रीम बनवण्यात यायचं. यावेळी आईस्क्रीम विकण्यासाठी त्यांना मुख्य पदार्थ म्हणून पावभाजी विकावी लागली. त्यावेळी ते साईड बाय साईड आईस्क्रीम विकू शकले. मात्र त्यांच्या आईस्क्रीमच्या उत्कृष्ट चवीमुळे आज नॅचरल देशातील एक प्रसिद्ध आणि लोकांच्या पसंतीस उतरलेल्या ब्रँड आहे.