देशातील लोकसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी बाकी असला तरी त्याबद्दल अनेक अंदाज समोर येत आहेत. याच विषयावर आता लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणता पक्ष सरकार स्थापन करेल? देशात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार स्थापन होणार का? याबाबत टाईम्स नाऊ नवभारत आणि ईटीजी रिसर्चने हे सर्वेक्षण केले आहे. यातून त्यांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत.
टाईम्स नाऊच्या या सर्वेक्षणात देशभरातून 90 हजार लोकांनी सहभाग घेतला. देशात आता निवडणुका झाल्या तर पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा स्पष्ट संदेश या सर्वेक्षणात लोकांनी दिला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारला विरोधकांच्या युतीचा काहीही फरक पडणार नाही. त्याच वेळी देशातील 51 टक्के लोक मोदी सरकार 2.0 च्या कामावर समाधानी आहेत. अशी माहिती या सर्व्हेतून समोर आली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल
देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा अंदाज या सर्वेक्षणातून घेण्यात आला. त्यावर देशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे समोर आले दिले.
भाजपा+ : 292-338
काँग्रेस+ : 106-144
टीएमसी : 20-22
YSRCP : 24-25
बीजेडी :- 11-13
इतर :- 50-80
सर्वेक्षणात मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कामकाजावर किती टक्के लोक समाधानी आहेत, असे विचारले गेले. तर यावर 51 टक्के लोकांनी ते सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले आहे. 21 टक्के त्यांच्या कार्यशैलीवर खूश नाहीत, तर 16 टक्के लोकांनी ते बर्याच प्रमाणात समाधानी असल्याचे सांगितले. तर 12 टक्के लोकांनी ते सरासरी असल्याचे सांगितले.
…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने खळबळ